Join us

भर कोरोनात ‘ Pushpa’ची छप्परफाड कमाई, हिंदी व्हर्जनने ‘केजीएफ’लाही टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 4:38 PM

Pushpa: The Rise Box Office Collection : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या सिनेमाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.  एकीकडे रणवीर सिंगच्या ‘83’कडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली असताना दुसरीकडे ‘पुष्पा’ जोरात सुरू आहे. 

 Pushpa: The Rise Box Office Collection : अलीकडच्या काळात साऊथच्या अनेक चित्रपटांनी बॉलिवूडला अक्षरश: घाम फोडला आहे. एंटरटेनमेंट असो की टेक्नॉलॉजी किंवा मग बॉक्स ऑफिसवरची कमाई सगळ्यातच साऊथच्या सिनेमांनी बॉलिवूडला मागे टाकलं आहे. आता तर साऊथच्या एका सिनेमाने कमाल केलीये. होय, साऊथ स्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा’वर  (Pushpa The Rise) प्रेक्षकांच्या उड्या पडत आहेत. तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नड, हिंदी अशा पाच भाषांमध्ये रिलीज झालेल्या ‘पुष्पा’ने 13 दिवसांत देशभरात 201.50 कोटींची  छप्परफाड कमाई केली आहे. ‘पुष्पा’ने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. कमाईचा हा वेग बघता, लवकरच हा सिनेमा 250 कोटींचा पल्ला गाठेल, असं मानलं जात आहे.कमाईच्या बाबतीत ‘पुष्पा’ हा अल्लू अर्जुनचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा सिनेमा बसला आहे.

हिंदी व्हर्जनला उत्स्फूर्त प्रतिसाद‘पुष्पा’ हा अल्लू अर्जुनचा हिंदीत रिलीज झालेला पहिला सिनेमा आहे. पण याऊपरही या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनलाही मोठा प्रेक्षकवर्ग लाभला आहे. एकीकडे रणवीर सिंगच्या ‘83’कडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली असताना दुसरीकडे ‘पुष्पा’ची क्रेझ कायम आहे. पुष्पा’  हिंदी व्हर्जनने आत्तापर्यंत 42.45 कोटींचा बिझनेस केला आहे. लवकरच हा आकडा 50 कोटींवर पोहोचले, अशी अपेक्षा आहे.  कमाईच्या बाबतीत पुष्पा’च्या हिंदी व्हर्जनने इतर दक्षिण हिंदी डब चित्रपटांना मागे टाकले आहे. तर आतापर्यंत केजीएफ हिंदी या यादीत आघाडीवर होता.

 ‘केजीएफ’लाही टाकले मागे   गेल्या तीन वर्षात हिंदीमध्ये प्रदर्शित झालेल्या साऊथ चित्रपटांबद्दल बोलायचं तर, 2018 मध्ये रिलीज झालेल्या ‘केजीएफ 1’बद्दल सर्वात जास्त चर्चा झाली होती. पण आता पुष्पा’ने ‘केजीएफ1’ देखील मागे टाकले आहे. पुष्पा’च्या हिंदी व्हर्जनने 13 दिवसांत 45.5 कमाई केली आणि याचसोबत ‘केजीएफ 1 हिंदी’चा 44.09 कोटींचा विक्रम मोडीत काढला.

पुष्पा’च्या कमाईने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ना मोठ्या जाहिराती, ना प्रमोशन इव्हेंट तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं.    या चित्रपटात अल्लू अर्जुनशिवाय रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल मुख्य भूमिकेत आहेत. याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे.

टॅग्स :अल्लू अर्जुनTollywoodबॉलिवूड