मुंबई : दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२२ रविवारी मुंबईत पार पडला. यामध्ये ब्लॉकबस्टर हिट 'पुष्पा: द राइज' हा या वर्षातील सर्वोत्तम ठरला आहे. तर शेरशहा हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. त्याचबरोबर रणवीर सिंगला '८३' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. 'मिमी' चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेत्री क्रिती सेननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार देण्यात आला.
अभिनेत्री आशा पारेख यांना चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी गाैरविण्यात आले. ‘कॅंडी’ ही सर्वाेत्तम वेब सिरीज ठरली आहे. मनाेज बाजपेयी ‘द फॅमिली मॅन-२’ या वेब सिरीजसाठी सर्वाेत्तम अभिनेता आणि रविना टंडनला ‘अरण्यक’ या वेब सिरीजसाठी सर्वाेत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. ‘सरदार उधम’ हा परीक्षकांच्या मते सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला.