Join us

'प्यार तो होना ही था'फेम 'या' अभिनेत्याला ओळखलं का? त्याची पत्नी आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 15:12 IST

Bijay J Anand: राहुलची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याने एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीसोबत लग्न केलं आहे.

बॉलिवूडच्या इतिहासातील विशेष गाजलेला सिनेमा म्हणजे 'प्यार तो होना ही था'. अजय देवगण आणि काजोल यांची केमिस्ट्री असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. आजही हा सिनेमा प्रेक्षक आवडीने पाहतात. या सिनेमातील राहुल आठवतोय का तुम्हाला? काजोलच्या प्रियकराची भूमिका साकारुन त्याने लोकप्रियता मिळवली होती. विशेष म्हणजे राहुलची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याने एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीसोबत लग्न केलं आहे.

'प्यार तो होना ही था' या सिनेमात राहुल ही भूमिका अभिनेता बिजय आनंद याने साकारली होती. बिजयने अनेक सिनेमांमध्ये लहान-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.  बिजय 'प्यार किया तो डरना क्या' या सिनेमात अखेरचा झळकला. त्यानंतर तो फारसा कुठे दिसला नाही. बिजयने त्याचं संपूर्ण आयुष्य योगसाधनेसाठी वाहुन दिलं आहे.

बिजयने एका प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लग्न केलं आहे. या अभिनेत्रीने तिच्या उत्तम अभिनयशैलीमुळे मराठी सिनेसृष्टी गाजवली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सोनाली खरे आहे. बिजय आणि सोनाली यांनी काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतरही सोनालीने तिचं करिअर उत्तमरित्या सांभाळलं आहे. 

टॅग्स :बिजय आनंदसोनाली खरेसेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूड