Join us  

‘क्वीन’ व ‘हैदर’ यांची बाजी

By admin | Published: June 09, 2015 2:54 AM

१६ व्या आयफा पुरस्कार सोहळ्याने संपूर्ण क्वालालंपूरवर बॉलीवूडने आपली छाप सोडली. हैदर आणि क्वीन या बॉलीवूड चित्रपटांना या वर्षीचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला.

डिप्पी वांकाणी, क्वालालंपूर१६ व्या आयफा पुरस्कार सोहळ्याने संपूर्ण क्वालालंपूरवर बॉलीवूडने आपली छाप सोडली. हैदर आणि क्वीन या बॉलीवूड चित्रपटांना या वर्षीचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला, तर उत्कृष्ट अभिनेता व उत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कार शाहिद कपूर व कंगना राणावत यांनी पटकावले. क्वीन व हैदर या दोन्ही चित्रपटांना या सोहळ्यात प्रत्येकी तीन पुरस्कार मिळाले. तर उत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट म्हणून रितेश देशमुख अभिनीत लय भारी या मराठी चित्रपटास पुरस्कार मिळाला. दीपिकासाठी रणवीरची कविता राजकुमार हिरानी यांना पीके चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला, तर दीपिका पदुकोनला आयफाचा वूमन आॅफ दी इयर पुरस्कार मिळाला. मला प्रेरित करणाऱ्या लाखो महिलांसाठी हा पुरस्कार असे म्हणत तिने हा पुरस्कार स्वीकारला. तर प्रसिद्ध अभिनेता रणवीरने याप्रसंगी दीपिकासाठी खास कविता सादर केली आणि या क्षणाला सोनेरी झळाळी दिली. भारतीय सिनेमाला जागतिक व्यासपीठ देणारा हा सोहळा क्वालालंपूर येथील पुत्रा स्टेडियमवर दिमाखात साजरा झाला. बॉलीवूडचे युवा अभिनेते रणवीर सिंग आणि अर्जुन सिंग यांनी या बहुप्रतीक्षित कार्यक्रमाचे अँकरिंग केले. > क्वीनची अनुपस्थिती क्वीन (मध्यमवर्गीय मुलीने स्वत:ची ओळख पटविण्यासाठी केलेला प्रवास) ला या सोहळ्यात उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या चित्रपटाची नायिका व आयफाची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कंगना राणावत या सोहळ्यास उपस्थित नव्हती.> कलाकारांचे सोनेरी क्षण : हृतिक रोशन व शाहिद कपूर यांच्या नृत्यामुळे श्रोते थरारून गेले. सोनाक्षी सिन्हाने आपल्या सादरीकरणाने प्रेक्षकांना जिंकून घेतले. परिणिती चोप्राने परेशान, बेबी डॉल , लव्हली व ड्रामा क्वीन या चित्रपटातील प्रसंगावर उत्कृष्ट कार्यक्रम सादर केला, तर श्रद्धा कपूरने खलनायक हू मै, चोली के पीछे क्या है व ओम शांती ओम ही गाणी सादर करून आपली छाप सोडली. अनुष्का शर्माने आपल्या बॉम्बे वेल्वेट चित्रपटातील गाण्यावर जबरदस्त कार्यक्रम सादर केला. यावर्षीचा आयफा चित्रपट पुरस्कार सोहळा प्रथमच कलर्स वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे.> जोडगोळीची द्वंद्वगीते : कार्यक्रमाचे उद्घाटन द्वंद्वगीताने झाले, रणवीर सिंग व अर्जुन सिंग यांनी सादर केलेल्या मै खिलाडी तू अनाडी, डोला रे डोला, मेरे दो अनमोल रतन या गाण्यांनी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू तर डोळ्यात अश्रू आणले. प्रसिद्ध चित्रपट निर्माते सुभाष घई यांना या सोहळ्यात भारतीय सिनेमासाठी दिलेल्या अभूतपूर्व योगदानासाठी पुरस्कार देण्यात आला. बॉलीवूडमधील फ्रेश चेहरे टायगर श्रॉफ व कृती सनन यांना पहिल्याच चित्रपटातील अभिनयासाठी गौरविण्यात आले, तर हैदर चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी के. के. मेनन यांना पुरस्कार देण्यात आला. दृष्टिक्षेपात आयफा पुरस्कारउत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट : लय भारी उत्कृष्ट चित्रपट : क्वीनउत्कृष्ट अभिनेत्री : कंगना राणावत - क्वीन उत्कृष्ट अभिनेता : शहीद कपूर - हैदर उत्कृष्ट खलनायक : के के मेनन - हैदर उत्कृष्ट दिग्दर्शन : राजकुमार हिरानी - पी के उत्कृष्ट गायक : अंकीत तिवारी - गलीयाँ (एक व्हिलेन) उत्कृष्ट गायिका : कणिका कपूर - बेबी डॉल उत्कृष्ट सपोर्टिंग भूमिका : पुरुष - रितेश देशमुख  (एक व्हिलेन) उत्कृष्ट सपोर्टिंग भूमिका : महिला - तब्बू - हैदर उत्कृष्ट विनोदी भूमिका : वरुण धवन - मै तेरा हिरो उत्कृष्ट पहिली भूमिका : टायगर श्रॉफ - हिरोपंती उत्कृष्ट पहिली भूमिका : कृती सनन - हिरोपंती उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक : शंकर एहसान लॉय - २ स्टेट्स उत्कृष्ट पहिले दिग्दर्शन : उमंग कुमार - मेरी कोम, साजिद नाडियादवाला - किक