हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक क्लासिक चित्रपटांचा साक्षीदार राहिलेला आर. के. स्टुडिओवरची कपूर कुटुंबाची मालकी आता संपुष्टात आली आहे. होय, ७० वर्षांचा वैभवी काळ अनुभवणा-या आर. के. स्टुडिओची वास्तू आता गोदरेज प्रॉपर्टीजने विकत घेतली आहे. नुकतीच गोदरेज प्रॉपर्टीजने हा स्टुडिओ खरेदी केल्याची अधिकृत घोषणा केली. येत्या काळात आर. के. स्टुडिओच्या जागी आलिशान फ्लॅट्स बांधले जाणार आहेत. आर. के. स्टुडिओच्या ३३,००० वर्ग मीटर क्षेत्रात आधुनिक निवासी अपार्टमेंट बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती गोदरेज प्रॉपर्टीजने दिली आहे.रणधीर कपूर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आर. के. स्टुडिओच्या जागवेवर नवीन बांधकाम करण्यासाठी आम्ही गोदरेज प्रॉपर्टीज कंपनीला निवडले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
आर. के. स्टुडिओच्या जागेवर उभे राहणार आलिशान फ्लॅट्स! गोदरेज प्रॉपर्टीजची मालकी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 13:45 IST
हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक क्लासिक चित्रपटांचा साक्षीदार राहिलेला आर. के. स्टुडिओवरची कपूर कुटुंबाची मालकी आता संपुष्टात आली आहे. होय, ७० वर्षांचा वैभवी काळ अनुभवणा-या आर. के. स्टुडिओची वास्तू आता गोदरेज प्रॉपर्टीजने विकत घेतली आहे.
आर. के. स्टुडिओच्या जागेवर उभे राहणार आलिशान फ्लॅट्स! गोदरेज प्रॉपर्टीजची मालकी!
ठळक मुद्देशो मॅन राज कपूर यांनी या स्टुडिओची स्थापना केली होती. या स्टुडिओने चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ पाहिला.