मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) आणि प्राजक्ता माळीची (Prajakta Mali) ‘रानबाजार’ ( RaanBaazaar Teaser ) ही नवी मराठी वेबसीरिज प्लॅनेट मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. काल तेजस्विनी व प्राजक्ताने या सीरिजचे एकापाठोपाठ एक असे दोन टीझर रिलीज केलेत आणि सगळीकडे याच टीझरची चर्चा रंगली. विशेषत: टीझरमधील प्राजक्ता माळीचा आत्तापर्यंत कधीही न दिसलेला बोल्ड अवतार पाहून चाहते थक्क झालेत. काहींनी हा टीझर आवडला. पण काहींनी मात्र हा बोल्ड टीझर पाहून नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर अनेकांनी हा टीझर पाहून प्राजक्ताला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
प्राजक्ता झाली ट्रोलरानबाजार सीरिजचा टीझर प्राजक्ताने शेअर केला. ‘प्रत्येक कलाकाराला आपल्या कारकिर्दीत विविधांगी भूमिकांमध्ये झळकण्याची, समाजात अस्तित्वात असणारी विविध पात्रं साकारण्याची, सतत काहितरी नवं करण्याची इच्छा असते. मी त्याला अपवाद नाही. लहानपणापासून स्मिता पाटील, रंजना यांना बघत मोठी झाले, (मी त्यांच्याइतकी मोठी नक्कीच नाही.) पण त्यांच्या कारकिर्दीतून प्रेरीत होऊन आणि तुम्हां मायबाप रसिक प्रेक्षकांवर विश्वास ठेवून केलेला हा प्रयत्न....,’ असं कॅप्शन तिने हा टीझर शेअर करताना दिलं. पण प्राजक्ताने हा टीझर शेअर करताच लोकांनी तिला नको त्या भाषेत ट्रोल करणं सुरू केलं. अखेर प्राजक्ताने टीझरवरचं कमेंट्स सेक्शनचं बंद केलं.
युजर्स भडकलेतेजस्विनी पंडितने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर ‘रानबाजार’चे दोन्ही टीझर शेअर केलेत आणि हे बोल्ड टीझर पाहून युजर्स भडकले. ‘काही तरी स्टँडर्ड ठेवायचं स्वत:चं’, अशी कमेंट एका युजरने केली. ‘रोलबद्दल तुझं अभिनंदन.. पण फायनली तुला बोल्ड होऊन अॅक्टिंग स्किल दाखवायला लागली. सॉरी पण मी तुझ्यावर टीका करत नाहीये,’ अशा शब्दांत एका युजरने प्राजक्ता माळीला ट्रोल केलं. ‘आपली संस्कृती संपत चाललीये. केजीएफ, बाहुबली सारख्या सिनेमात एक पण बोल्ड किंवा इंटिमेट सीन दाखवत नाहीत. तरीही सुपरहिट होतात. त्यांच्याकडून काहीतरी शिकायला पाहिजे,’ अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. ‘तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. शेवटी पैशात किती ताकद आहे, दिसलंच,’ असं एका युजरने लिहिलं. ‘फक्त अश्लीलता व घाणेरडेपणा. बाकी काहीही नाही. लोकांचे मॅसेज वाचून कीव करावीशी वाटते. कुठे ते सुंदर सोज्वळ मराठी चित्रपट व उत्तम कलाकृती आणि कुठे ही दळभद्री विकृती. वेबसीरिजच्या मागे वेडे झालेले लोक हे समाजाचे नैतिक अध:पतन आहे,’ अशा तीव्र शब्दांत एका युजरने आपली नाराजी व्यक्त केली.
काही युजर्सनी मात्र भूमिकेवरून कलाकारांना ट्रोल करणं योग्य नसल्याची भूमिका मांडली.
रेगे, ठाकरे असे सिनेमे बनवणरारे आणि ज्वलंत विषय हाताळणारे दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी ‘रानबाजार’ ही सीरिज दिग्दर्शित केली आहे. 20 मे पासून ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
'त्या' दोघींमुळे राजकारणात आणलेल्या वादळाची रंजक गोष्ट!
'रानबाजार'... नवी कोरी वेबसीरीज पाहा फक्त प्लॅनेट मराठीवर. अॅप इन्स्टॉल करा आत्ताच!
अँड्रॉईड युजर्ससाठी >> https://bit.ly/3wCnSPx
आयफोन युजर्ससाठी >> https://apple.co/39Z5cBS