अभिनेत्री पूजा हेगडे 'राधे श्याम' चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर इटलीहून मायदेशी परतली आहे.पूजासह या चित्रपटात तेलगू चित्रपटांतील सुपरस्टार प्रभास मुख्य भूमिकेत आहेत. तिच्यासोबत ती हैदराबादमध्ये चित्रपटाच्या अंतिम शेड्यूलचे शूटिंग करणार आहे.
ऑक्टोबर सुरुवातीस पूजा 'राधे श्याम' हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी देशातून इटलीला रवाना झाली होती. 13 ऑक्टोबर रोजी पूजाने आपला वाढदिवस चित्रपटाच्या सेटवरच साजरा केला. दरम्यान, 'राधे श्याम' चित्रपटाच्या निर्मात्यांनी पूजाच्या पहिल्या लूकचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्यात पूजाच्या चाहत्यांना तीची पहिली झलक पाहायला मिळाली.
इटलीवरून पूजा तिचे शूट संपवून परत आली आहे पण लवकरच ती हैदराबादला जाऊन प्रभाससोबत ह्या चित्रपटाचे उर्वरित शूट पूर्ण करणार आहे. यासाठी हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये एक खास सेट तयार करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी चित्रपटाचे मोशन पोस्टर देखील प्रसिद्ध केले ज्याला सोशल मीडियावरील चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.