'बाहुबली' फेम अभिनेता प्रभासचा आगामी चित्रपट ‘राधेश्याम’च्या घोषणेपासूनच चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पहायला मिळतो आहे. प्रभासचे चाहते चित्रपटाशी जोडलेली प्रत्येक गोष्ट जाणण्यासाठी उत्सुक आहेत. चित्रपट त्याच्या पहिल्या घोषणेपासूनच सोशल मीडियावर ट्रेंड करतो आहे. काही दिवसांपूर्वीच राधे श्याम या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. त्यानंतर 'राधेश्याम' या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला होता.
आता गुढी पाडव्यानिमित्त आज या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रसिद्ध झाले आहे. या पोस्टरमध्येही प्रभास डॅशिंग लूकमध्ये दिसून येत आहे. विशेष म्हणजे प्रभासच्या रेट्रो लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.'राधेश्याम' मध्ये अभिनेत्री 'पूजा हेगडे' मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
'राधे श्याम' एक रोमॅन्टिक-ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात प्रभास एक लव्हर बॉयच्या भूमिकेत दिसणार आहे. नवीन पोस्टर प्रदर्शित झाल्यापासू ६ लाखांहून अधिक लोकांनी पसंती दिल्याचे पाहायला मिळत आहे. हा चित्रपट हिंदीसोबतच इंग्रजी भाषेतही रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटात अभिोनेत्री भाग्यश्री देखील एक महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
‘राधेश्याम’ एक बहुभाषीक चित्रपट असून राधा कृष्ण कुमार यांच्याद्वारे दिग्दर्शित करण्यात येत आहे. हा चित्रपट गुलशन कुमार आणि टी-सीरीज द्वारे प्रस्तुत आणि यूवी क्रिएशंस द्वारे निर्मित आहे. हा बिग बजेट ड्रामा, रोमँटिक चित्रपट आहे, ज्यामध्ये पूजा हेगडे आणि प्रभास यांच्याशिवाय भाग्यश्री, प्रियदर्शी, सचिन खेडेकर, मुरली शर्मा, कुणाल रॉय कपूर इत्यादी मुख्य भूमिकेत आहेत.
प्रभासचा 'राधेश्याम' पुन्हा चर्चेत, काही मिनीटांच्या सीनसाठी कोट्यावधींचा केला गेला खर्च
बिग बजेट असणा-या सिनेमात कोणत्याही गोष्टीमध्ये कमतरता राहू नये म्हणून बारकाईने लक्ष दिले जात आहे. त्यामुळेच प्रभासच्या कॉस्ट्यूमसाठी निर्मात्यांनी ६ कोटींचा खर्च केल्याचं समोर आलं होतं त्यानंतर आता सिनेमातल्या एका सीनचीही जोरदार चर्चा होत आहे. या काही मिनिटांच्या सीनसाठी कोट्यवधींचा खर्च केल्याचं बोललं जात आहे. काही मिनिटांच्या सीनसाठी जवळपास १.५ कोटी रुपयांचा खर्च केला आहे.