मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री राधिका आपटे बोल्ड आणि बिनधास्त म्हणून चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहे. आपल्या मनात जे आहे ते बिनधास्त आणि बेधडकपणे मांडणे, कुणाचीही विशेषतः लोक काय विचार करतील याचा विचार न करता व्यक्त होणारी एक रोखठोक अभिनेत्री अशी राधिका आपटे हिची ओळख. वैयक्तीक असो वा व्यावसायिक कोणत्याही गोष्टीवर आपलं ठाम मत मांडताना ती जराही कचरत नाही. आता राधिकाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे जो तिच्या पहिल्या चित्रपटातील आहे.
राधिका आपटे हिने तिच्या पहिल्या चित्रपटातील फोटो शेअर करत म्हटलं की, मी केलेला पहिला चित्रपट. चित्रपटांच्या आठवणी.
तिने पुण्यातून तिच्या अभिनयाच्या कारकीर्दीला सुरूवात केली आहे.
राधिकाने हिंदी चित्रपटाशिवाय मल्याळम, बंगाली, मराठी आणि तमीळ चित्रपटात काम केलं आहे. तसेच अनेक वेबसिरिजमध्ये देखील ती झळकली आहे.