अभिनेत्री राधिका आपटेने 2012मध्ये लंडनमधील प्रसिद्ध संगीतकार बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केले आहे. राधिकाला अनेकवेळा तिने हे लॉन्ग डिस्टेंस लग्न का केले असा प्रश्न विचारण्यात आला ? अखेर याचं खरं कारण तिने सांगितलं.
राधिका म्हणाली 2012मध्ये तिला इंग्लंडचा सहज व्हिसाची आवश्यकता होती. राधिका सांगते, त्यावेळी इंग्लंडचा व्हिसा मिळणं खूप कठीण होते म्हणून तिने संगीतकार बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केले. राधिका आपटेने विक्रांत मॅस्सीसोबत नुकताच झालेल्या व्हिडिओ चॅट दरम्यान ही गोष्ट सांगितली. राधिका सध्या आपल्या पतीसोबत लंडनमध्ये आहे. राधिकाचे हे उत्तर ऐकून तिचे फॅन्सना नक्कीच धक्का बसू शकतो. राधिका पुढे म्हणाली, तिचा लग्न या संस्थेवर विश्वास नाही. ती म्हणाली, "जेव्हा मला समजले की लग्न केल्यामुळे सहजपणे व्हिसा मिळू शकतो, तेव्हा मला वाटले की लग्नासाठी कोणत्याच सीमा असू नयेत."
राधिकाच्या आगामी प्रोजेक्टबाबत बोयचे झाले तर, तिने आजवर मराठी, बंगाली, तेलगू, कन्नड व मल्याळम भाषेतील सिनेमा, वेबसीरिज आणि लघुपटात काम केल्यानंतर आता ती हॉलिवूड सिनेमातही झळकणार आहे. या सिनेमाची घोषणा खुद्द तिनेच इंस्टाग्रामवर केली आहे. या सिनेमाचे नाव आहे 'अ कॉल टू स्पाय'. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अ कॉल टू स्पाय सिनेमा आयएफसी फिल्मने घेतला आहे.