राधिका आपटे हिने अभिनय क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूड चित्रपटांशिवाय राधिका ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील खूप बिझी असते. राधिकाचा आज 35वा वाढदिवस आहे. तिचा जन्म 7 सप्टेंबर रोजी 1985 साली झाला होता. राधिकाला बालपणापासून अभिनेत्री बनायचे होते. या निमित्ताने जाणून घेऊयात तिच्याबद्दल
.राधिका आपटे हिने भारतीय क्लासिकल डान्सचे प्रशिक्षण घेतले आहे. तिने आठ वर्षे रोहिणी भाटेकडून कथ्थकचे धडे गिरविले आहेत. तिने शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून पूर्ण केले आहे. पुण्यात राहत असताना ती थिएटरशी जोडली गेली. त्यानंतर ती मुंबईला आली. सुरूवातीला राधिका मुंबईत पेइंग गेस्ट म्हणून राहत होती.
राधिकाने 2005 साली वाह लाइफ हो तो ऐसी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर शोर इन द सिटी चित्रपटातून तिने मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. त्यानंतर तिने रक्त चरित्र, रक्त चरित्र 2 आणि आयएम या चित्रपटात काम केले.
काही काळ कामातून ब्रेक घेऊन राधिका लंडनमध्ये राहून डान्स शिकू लागली. राधिकाच्या मते लंडनमध्ये राहिल्यानंतर तिचे जीवन पूर्णपणे बदलून गेली. तिच्या विचार करण्याची पद्धत बदलली. लंडनमध्ये तिची म्युझिशियन बेनेडिक्ट टेलरसोबत भेट झाली.
राधिका व टेलरनं २०१२ साली लग्न केलं. राधिकाला शूटिंगमधून जेव्हा वेळ मिळतो, तेव्हा ती लंडनला जाते. एक वर्षे डेट केल्यानंतर या दोघांनी २०१२ साली लग्न केलं आणि २०१३मध्ये अधिकृतपणे जाहीर केलं होतं.
राधिका म्हणाली, जेव्हा टेलरने मला डेट करायला सुरूवात केली होती. त्यावेळी त्याने आपली नोकरी सोडून भारतात येण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आम्हा दोघांना हे योग्य वाटले नाही. आम्ही दोघे आमच्या करियरकडे गांभीर्याने पाहतो. त्यामुळे काम सोडून आम्ही दोघेही खूश राहू शकत नाही. त्यामुळे आम्ही दोघेही कामांना प्राधान्य देतो व एकमेकांना नेहमी प्रोत्साहन देतो.
राधिका आपटे शेवटची रात अकेली है चित्रपटात झळकली.