Join us

'कच्चे लिंबू' चित्रपटात जसप्रीत बुमराहच्या शैलीत राधिका मदानची गोलंदाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 19:03 IST

Kachche Limbu : 'कच्चे लिंबू'ची हृदयस्पर्शी कहाणी ही भावंडांवर आधारित आहे.

राधिका मदान, रजत बरमेचा आणि आयुष मेहरा अभिनीत जिओ स्टुडिओजचा चित्रपट कच्चे लिंबू १९ मे रोजी जिओ सिनेमावर डिजिटल प्रीमियरसाठी सज्ज आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून कौटुंबिक अपेक्षांमध्‍ये स्वतःच्या स्वप्नांचा पाठपुरावा करताना येणाऱ्या आव्‍हानांचा शोध घेणारी तसेच भाऊ- बहिणीच्या अतूट बंधनाची म्हणजेच स्लाइस ऑफ लाईफ चित्रपट कच्चे लिंबू. ज्यामध्ये राधिका मदन तिच्या भावाच्या विरोधी संघात गल्ली क्रिकेट खेळताना दिसणार आहे.

लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे भारतीय क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहच्या शैलीत राधिका गोलंदाजी करताना दिसणार आहे. दिग्दर्शक शुभम योगी याबद्दल म्हणाले की, "जेव्हा आम्ही क्रिकेट प्रॅक्टिसची तयारी सुरू केली होती तेव्हा मला कलाकारांमधून नैसर्गिकरीत्या काय येते ते पहायचे होते. राधिका तिच्या मोठ्या भावासोबत अंडरआर्म खेळतच मोठी झाली होती आणि  तिला क्रिकेट बद्दल कितीपत महिती आहे हे दाखवण्यासाठी ती खूप उत्सुक होती. पण  त्याहूनही अधिक ती वेगळ्या प्रकारची बॉलिंग अँक्शन शोधून, स्वतःच्या पात्रासाठी नवीन ओळख देण्यासाठी उत्सुक होती.  आमचे संशोधन मुंबईच्या उपनगरातील अंडरआर्म टूर्नामेंटमध्ये सहभागी होण्यापासून ते एकत्र क्रिकेटचे हायलाइट्स पाहण्यापर्यंत होते. आणि या सर्व तयारीमध्ये आम्ही राधिकाचे गोलंदाजी शॉट्स घेतले ज्यात जगातील सर्वोत्तम गोलंदाज - जसप्रीत बुमराह च्या गोलंदाजी शैलीचे साम्य होते व ते तिच्यात नैसर्गिकरित्या आले आहे असे मला वाटते.

कच्चे लिंबूची हृदयस्पर्शी कहाणी ही भावंडांवर आधारित आहे. ही कथा अदितीची आहे, एक अशी तरुण मुलगी जी प्रत्येकाने तिच्यावर लादलेली स्वप्ने पूर्ण करण्याच्या शर्यतीत असते आणि प्रत्येक वेळी ती यशस्वी ही होते. धैर्याची, दृढनिश्चयाची आणि स्वतःला शोधून काढण्याची ही कथा आहे. एक भावनिक रोलरकोस्टर आहे ज्यामध्ये ती तिच्या कुटुंबाला, मित्रांना आणि विशेषत: तिच्या मोठ्या भावाला हे सिद्ध करण्याचा निर्णय घेते की जीवनात कधी कधी गोंधळात पडणे ही वाईट गोष्टच असते असे काही नाही, योग्य निर्णय तुमच्यापर्यंत योग्य वेळी पोहोचेलच.
टॅग्स :राधिका मदन