आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्डा (Raghav Chadda) गेल्या काही दिवसांपासून वेगळ्याच कारणाने चर्चेत आले. राजकीय कारणाने नाही तर वैयक्तिक आयुष्यात ते एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडले ती म्हणजे परिणीती चोप्रा (Parineeti Chopra). गेल्या आठवड्यातच परिणीती आणि राघव चड्डाचा साखरपुडा दिल्ली येथे पार पडला. जवळचे मित्र परिवार नातेवाईक उपस्थित होते. यावेळी राघव चड्डा आणि एका व्यक्तीचं बोलणं रेकॉर्ड झालं. ज्यामध्ये मी नाकाची सर्जरी केल्याचा खुलासा राघव चड्डा यांनी स्वत:च केल्याचं समोर आलंय. काही माध्यमांच्या रिपोर्टनुसार एका फोटोग्राफरकडे हे संभाषण रेकॉर्ड झालंय.
राघव चड्डा आणि परिणीती चोप्रा यांचा साखरपुडा दिल्लीतील कपुरथशा येथे थाटामाटात पार पडला. साखरपुड्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. दोघंही साखरपुड्यात एंजॉय करताना दिसले. दरम्यान एका फोटोग्राफरने शेअर केलेल्या व्हिडिओत राघव एका महिलेशी बोलताना दिसतो. यात ती महिला त्याला म्हणते, "तुझ्या चेहऱ्यात काहीतरी बदल दिसतोय. काय आहे नेमकं? तर यावर राघव म्हणतो, "हो, मी नाकाची छोटी शस्त्रक्रिया केली आहे. माझं नाक आधी माझ्या आईसारखं होतं, मात्र आता मी ते माझ्या वडिलांसारखं केलं आहे."
राघव चड्ढाची ही प्रतिक्रिया पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. राघवने असा खुलासा करताच परिणीती त्याला सावध करताना दिसते आणि म्हणते कॅमेरे आहेत. नंतर हा व्हिडिओ फोटोग्राफरने डिलीट केला आहे. आता राघव चड्डा यांनी खरंच अशी सर्जरी केली का की त्यांनी गंमतीत असं उत्तर दिलं आहे याचा अंदाज नेटकरी व्यक्त करत आहेत.