Join us

राघव जुयाल, कृतिका कामरा आणि धैर्य कारवाचा 'ग्यारह ग्यारह'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 7:29 PM

11:11 Series : राघव जुयाल, कृतिका कामरा आणि धैर्य कारवा अभिनीत 'ग्यारह ग्यारह' ही कलाकृती सध्याच्या पार्श्वभूमीवर युग आर्य (राघव जुयाल) या तरुण पोलिस अधिकाऱ्याच्या कथेवर आधारित आहे.

'ग्यारह ग्यारह' ही कलाकृती म्हणजे गुनीत मोंगा यांची सिख्या एंटरटेनमेंट आणि करण जोहर यांच्या धरमॅटीक एंटरटेनमेंटची प्रस्तुती असून उमेश बिष्त दिग्दर्शित आहे. त्यात राघव जुयाल, कृतिका कामरा आणि धैर्य कारवा हे दमदार कलाकार झळकणार आहेत. ही सीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 

राघव जुयाल, कृतिका कामरा आणि धैर्य कारवा अभिनीत 'ग्यारह ग्यारह' ही कलाकृती सध्याच्या (२०१६) पार्श्वभूमीवर युग आर्य (राघव जुयाल) या तरुण पोलिस अधिकाऱ्याच्या कथेवर आधारित आहे. या सीरिजबद्दल राघव जुयाल म्हणाला, सरतेशेवटी प्रतिक्षा संपली! झी 5 वर ‘ग्यारह ग्यारह’च्या प्रीमियमची उत्सुकता आमच्या सर्वांमध्ये आहे. यापूर्वी मी कधीही असा कार्यक्रम केला नाहीये. हा सर्वार्थाने निराळा अनुभव होता आणि प्रेक्षक कधी एकदा तो अनुभवतात याची वाट पाहणे कठीण आहे. डेव्हिड ससून लायब्ररीतील क्लॉक टॉवरच्या पार्श्वभूमीवर रंगविण्यात आलेले प्रदर्शन चित्तथरारक होते.

कृतिका कामरा म्हणाली, आम्ही खूप उत्साहित आहोत की 'ग्यारह ग्यारह' अखेर ZEE5 वर प्रदर्शनासाठी सज्ज आहे. मी खरोखरच 11:11 च्या जादूवर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली आहे! डेव्हिड ससून लायब्ररीच्या क्लॉक टॉवरवरील थ्रीडी प्रक्षेपण हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण होता. धैर्य कारवा पुढे म्हणाले, ग्यारह ग्यारह तुम्हाला अनेक स्तरांवर प्रभावित करेल-हे एक मनोरंजक रहस्य आहे, एक विचारप्रवर्तक नाट्य आहे, जे काळाच्या संकल्पनेवर नव्याने भाष्य करणारे आहे हा विश्वास मला वाटतो. तर मग, 'क्या बात है' म्हणण्याची तयारी करा! कारण ही मालिका तुम्हाला अगदी शेवटपर्यंत अंदाज लावायला भाग पाडेल. 

टॅग्स :कृतिका कामरा