‘बिग बॉस 14’ या टीव्ही रिअॅलिटी शोचे स्पर्धक राहुल वैद्यने जेव्हा गर्लफ्रेंड दिशा परमारला लग्नासाठी नॅशनल टीव्हीवर प्रपोज केले तेव्हा सगळ्यांना धक्का बसला होता. त्यानंतर दिशानेही लग्नाला होकार दिला. नुकत्याच एका मुलाखतीत राहुल वैद्यची आई गीता वैद्य यांनी लग्नाबद्दल खुलासा केला आहे. ते म्हणाल्या की, जून महिन्यात दोघे लग्नाच्या बेडीत अडकू शकतात.
स्पॉटब्वॉयशी बोलताना गीता वैद्य म्हणाल्या, “आम्ही लग्नाची जूनसाठी तयारी करतो आहोत. अद्याप लग्नाची तारीख निश्चित केलेली नाही, कारण राहुल एकदा बिग बॉसमधून बाहेर आला की मग यावर त्याचा सल्ला घेऊ. त्याचीही लग्नाविषयीची काही स्वप्ने आहेत. आम्ही फक्त बेसिक तयारी करीत आहोत, तो आल्यानंतर गोष्टी निश्चित केल्या जातील. ”
दिशा ही सुद्धा टीव्ही इंडस्ट्रीचा एक लोकप्रिय चेहरा आहे. आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे ती नेहमी चर्चेत असते. 'प्यार का दर्द' या टीव्ही शोमध्ये दिशाने काम केले आहे. दिशा व राहुलची पहिली भेट ‘याद तेरी’ या म्युझिक व्हिडीओच्या निमित्ताने झाली होती. या व्हिडीओनंतर दोघांच्या डेटींगच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. दिशा टीव्ही सीरियल 'ती अपना सा'मध्ये दिसली होती.