Join us

राहुल वैद्यने खरचं केलं दिशा परमारशी लग्न ? फोटो शेअर करत म्हणाला- नवी सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 15:10 IST

Rahul vaidya shares photo with disha parmar dressed up as bride and groom : सोशल मीडियावर राहुल वैद्य आणि दिशा पारमारच्या लग्नाचे फोटो गेल्या काही दिवसांपसाून व्हायरल होतेय.

 सोशल मीडियावर राहुल वैद्य आणि दिशा पारमारच्या लग्नाचे फोटो गेल्या काही दिवसांपसाून व्हायरल होतेय. या फोटोंमध्ये नववधू प्रमाणे नटलेली दिशा आणि नवरदेव बनलेला राहुल वैद्य दिसत होते. आता राहुल आणि दिशाने स्वत: हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. नवी सुरुवात असं कॅप्शन त्याने या फोटोसोबत दिलं आहे. चाहत्यांनी राहुल आणि दिशाच्या या फोटोवर अभिनंदन करण्यास सुरवात केली आहे. तसेच फॅन्स पेजवर हे फोटो जोरदार व्हायरल होतायेत. दोघांच्या चाहत्यांना थोडावेळ धीर धरावा लागले कारण रिपोर्टनुसार हे फोटो रिअल लाईफमधले नसून रिल लाईफमधले आहेत. रिपोर्ट्सनुसार राहुल आणि दिशाचा एक नवीन म्युझिक व्हिडिओ येत आहे. यात लग्नाचा सेक्वेन्स दाखवण्यात येणार आहे.यासाठी दोघांनी असा अंदाज पाहायला मिळत आहे. त्याच  शूटिंग दरम्यानचे हे फोटो आणि व्हिडीओ क्लिप व्हायरल होते आहे. 

राहुल आणि दिशा शूट करतायेत गाणंराहुल वैद्य गेल्या काही दिवसांपासून गाण्याच्या शूटिंगसाठी दिशासोबत चंडीगढमध्ये आहे.टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, त्याने मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, जेव्हा तो लग्न करेल तेव्हा ते जगाला सांगून करेल. 

 

टॅग्स :राहुल वैद्य