Join us  

स्वप्निलवर चाहत्यांचा प्रेमाचा पाऊस

By admin | Published: March 21, 2016 1:53 AM

मराठी इंडस्ट्रीचा शाहरूख खान आपला लाडका स्वप्निल जोशी या अभिनेत्याने दुनियादारी, तू ही रे, मुंबई-पुणे-मुंबई, मितवा अशा अनेक सुपरहिट चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे

मराठी इंडस्ट्रीचा शाहरूख खान आपला लाडका स्वप्निल जोशी या अभिनेत्याने दुनियादारी, तू ही रे, मुंबई-पुणे-मुंबई, मितवा अशा अनेक सुपरहिट चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. आज स्वप्निलच्या अभिनयाच्या यशाची पावती म्हणून त्याच्या चाहत्यांनी इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर लाखाचा टप्पा पार करून स्वप्निलवर अक्षरश: प्रेमाचा पाऊस पाडला. यासाठी स्वप्निलने सोशल मीडियावर एका व्हिडीओच्या माध्यमातून हटक्या लूकमध्ये सर्व चाहत्यांचे आभार मानले आहे. तसेच, लाखाचा टप्पा पार करणे ही आपल्यासाठी खूप आनंदाची व अभिमानाची गोष्ट असल्याचे स्वप्निलने सांगितले.