शाहरुख खान याचा ‘रईस’ हा चित्रपट रिलीज होण्याआधीच वादात सापडला आहे. अंडरवर्ल्ड डॉन अब्दुल लतीफ याचा मुलगा मुश्ताक शेख याने फिल्म मेकर्सवर १०१ कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. शाहरुख ‘रईस’मध्ये एका गँगस्टरच्या भूमिकेत आहे. ‘रईस’मध्ये शाहरुखने लतीफची व्यक्तिरेखा साकारल्याचे म्हटले जात आहे. यानंतर न्यायालयाने शाहरुखला नोटीस जारी केले आहे. ‘रईस’ हा चित्रपट माझ्या पित्याची बदनामी करणारा आहे. यात माझ्या वडिलांना वाईट दाखवले गेले आहे,असे मुश्ताक शेखने म्हटले आहे. ‘रईस’ची रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र सुरुवातीपासूनच हा चित्रपट वांद्यात सापडला आहे. अहमदाबादेत या चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना कथितरित्या एका धार्मिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शूटिंगचा विरोध केला होता. यावेळी शाहरुखच्या गाडीवर दगडफेकही झाली होती.
‘रईस’ वादात!
By admin | Published: May 01, 2016 2:24 AM