सध्या कुठे आहे राज कपूर यांच्यासोबत काम करणारी ही रशियन अभिनेत्री?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 05:14 PM2020-06-02T17:14:33+5:302020-06-02T17:15:56+5:30

राज कपूर यांच्या 1970 साली प्रदर्शित झालेल्या ‘मेरा नाम जोकर’ या  सिनेमातील एक विदेशी चेहरा आठवतो? होय, या चित्रपटात एका रशियन अभिनेत्रीने मरिना नावाच्या तरूणीची भूमिका साकारली होती.

raj kapoor death anniversary know about kseniya ryabinkina seen in film mera naam joker |  सध्या कुठे आहे राज कपूर यांच्यासोबत काम करणारी ही रशियन अभिनेत्री?

 सध्या कुठे आहे राज कपूर यांच्यासोबत काम करणारी ही रशियन अभिनेत्री?

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘मेरा नाम जोकर’नंतर 39 वर्षांनी म्हणजे 2009 साली ऋषी कपूर  यांच्या ‘चींटू जी’मध्ये सेनियाने एक लहानशी भूमिका केली होती.

राज कपूर यांच्या 1970 साली प्रदर्शित झालेल्या ‘मेरा नाम जोकर’ या  सिनेमातील एक विदेशी चेहरा आठवतो? होय, या चित्रपटात एका रशियन अभिनेत्रीने मरिना नावाच्या तरूणीची भूमिका साकारली होती. सर्कसमध्ये काम करणारी मरिना राजू अर्थात राज कपूरच्या प्रेमात पडते. या अभिनेत्रीचे नाव सेनिया रेबेंकीना. ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम केल्यानंतर सेनिया बॉलिवूडमधून जणू गायबच झाली. सेनिया सध्या रशियात राहते़ तिने कधीच वयाची सत्तरी ओलांडलीय.
सेनिया 24-25 वर्षांची असताना राज कपूर व तिची पहिली भेट झाली होती.

‘मेरा नाम जोकर’मधील  मरिना या ट्रॅपिज आर्टिस्टच्या भूमिकेसाठी राज कपूर एका चेह-याच्या शोधात होते. त्यांना हवी होती परदेशी युवती. रशियामध्ये गेल्यानंतर विविध सर्कशींच्या तंबूत राज कपूर दिवस दिवस घालवायचे. त्यातच एकदा ते बोल्शेई बॅले बघायला गेलेत. त्यात काम करणारी सेनिया त्याच्या डोळ्यांत भरली आणि राज कपूर यांना मरिना सापडली.

 मुळात सेनियाला चमकाबिमकायची फारशी आवड नव्हतीच. तिच्यापेक्षा चार वर्षांनी मोठी असलेली बहीण एलिना ही खरेतर त्या काळातील सेलिब्रिटी कलाकार.
पण बॅले पाहिल्यानंतर राज कपूर सेनियालाच भेटावेसे वाटले. याच रात्री राज कपूर यांनी सेनियाला आपल्या चित्रपटात काम करण्याची आॅफर दिली. सेनिया राज कपूर यांना ओळखत नव्हती. पण राज कपूर हे नाव मात्र तिच्या चांगलेच ओळखीचे होते. कारण त्यांचा आवारा व श्री 420 हे सिनेमे रशियातही गाजले होते.

सेनियाने लगेच राज कपूर यांची ऑफर स्वीकारली आणि ‘मेरा नाम जोकर’च्या शूटींगसाठी ती भारतात आली. 
सेनिया खरे बॅलेत काम करणारी. तिला चित्रपटात राज कपूर यांनी सर्कशीत ट्रॅपिझचे खेळ करणारी कलाकार बनवून टाकले. हा बदल  पचवणे सुरुवातीला सेनियाला जरा कठीण गेला. पण तिने चित्रपट पूर्ण केला. ‘मेरा नाम जोकर’नंतर  तिला भारतात काही फारसे काम मिळाले नाही. त्यामुळे सेनिया पुन्हा मायदेशी परतली आणि तिने बॅले डान्सिंगमधील करिअर सुरु केले.

मात्र ‘मेरा नाम जोकर’नंतर 39 वर्षांनी म्हणजे 2009 साली ऋषी कपूर  यांच्या ‘चींटू जी’मध्ये सेनियाने एक लहानशी भूमिका केली होती,
1988 मध्ये राज कपूर यांच्या निधनाची बातमी ऐकून सेनियाला मोठा धक्का बसला होता.


 

Web Title: raj kapoor death anniversary know about kseniya ryabinkina seen in film mera naam joker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.