बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपूर घराण्याची पाकिस्तानमधील पेशावर शहारातील ऐतिहासिक वडिलोपार्जित 'कपूर हवेली' जमीनदोस्त करण्याची तयारी सुरू झाली आहे. हवेलीच्या सध्याच्या मालकाने या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा घाट घातला आहे. २०१८ साली ऋषी कपूर यांनी पाकिस्तानी सरकारला 'कपूर हवेली' वस्तुसंग्रहालयात रुपांतरीत करावी अशी विनंती केली होती. सरकारकडून यासंबंधी निर्णय देखील घेण्यात आला होता. परंतु हवेलीच्या मालकाशी करार होऊ शकला नाही.'कपूर हवेली'चा मालकी हक्क सध्या जवाहिऱ्या हाजी मोहम्मद इसरार यांच्याकडे आहे. खैबर-पख्तुन्वा प्रांतातील पेशावरच्या किस्सा ख्वानी बाजार परिसरातील 'कपूर हवेली' जमीनदोस्त होण्याची दाट शक्यता आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे म्हणणे आहे की, हवेलीत भुतांचे वास्तव्य आहे. त्याचप्रमाणे हवेली मोडकळीस आली आहे आणि ती कोणत्याही क्षणी कोसळू शकते. हवेलीचे सध्याचे मालक हाजी मुहम्मद इसरार सध्या सरकारला हवेली देण्यास नकार दिला आहे.
सध्या या हवेलीत आता भुतांचे वास्तव्य असल्याचे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच ही हवेली कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. पहिला ही हवेली पाच मजल्याची होती पण आता तीन मजल्याची झाली आहे.