पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर राज कुंद्राचा सोशल मीडियाला रामराम, जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 10:29 AM2021-11-02T10:29:51+5:302021-11-02T10:31:22+5:30

Raj Kundra Deleted Social Media Accounts:  काही महिन्यांआधीपर्यंत राज कुंद्रा सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह होता. पण जुलै महिन्यात पॉर्नोग्राफीप्रकरणी अटक झाली आणि त्यानंतर सगळं बदललं. 

raj kundra has deleted his twitter instagram account after returning from 2 months of jail | पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर राज कुंद्राचा सोशल मीडियाला रामराम, जाणून घ्या कारण

पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर राज कुंद्राचा सोशल मीडियाला रामराम, जाणून घ्या कारण

googlenewsNext

Raj Kundra Deleted Social Media Accounts: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि बिझनेसमॅन राज कुंद्रा (Raj Kundra) काही महिन्यांआधीपर्यंत सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह होता. शिल्पासोबतचे फनी व्हिडिओ शेअर करण्याचा सपाटाच त्याने लावला होता. पण जुलै महिन्यात पॉर्नोग्राफीप्रकरणी (Pornography Case) अटक झाली आणि त्यानंतर सगळं बदललं. सुमारे 2 महिने तुरुंगात घालवल्यानंतर सप्टेंबर महिन्यात जामिनावर त्याची सुटका झाली. मात्र जामिनावर सुटल्यानंतर राज कुठेही दिसला नाही. माध्यमांसमोर येणं त्याने टाळलं आणि आता काय तर सोशल मीडियापासूनही त्याने फारकत घेतली आहे.
होय, राजने सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे. ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंट त्याने डिलीट केल्याचं कळतंय.

पॉर्नोग्राफी  प्रकरणी अटक होईपर्यंत राज इन्स्टाग्रामवर सक्रिय होता.  पण जामिनावर सुटल्यानंतर त्याने सोशल मीडियावर एकही पोस्ट केली नाही.
राजच्या अटकेनंतर शिल्पासुद्धा सोशल मीडियापासून बरेच दिवस दूर होती. मात्र काही काळ ब्रेक घेतल्यानंतर ती कामावर परतली. पाठोपाठ सोशल मीडियावरही अ‍ॅक्टिव्ह झाली. तथापि कुठल्याही पोस्टमध्ये तिने राजचा उल्लेख केला नाही. त्याचा फोटो शेअर केला नाही. अलीकडे शिल्पा मुलांसोबत अलिबागमध्ये सुट्टीवर गेली होती. पण इथेही राज तिच्यासोबत दिसला नाही. अगदी  करवा चौथनिमित्तही तिने स्वत:चा फोटो पोस्ट केला होता. पण या सर्व फोटोंमध्ये राज कुठेच दिसला नव्हता.

दोन महिने तुरुंगात काढल्यानंतर राज नॉर्मल लाईफमध्ये परतला आहे. अर्थात इतक्या मोठ्या घडामोडीनंतर सर्व काही इतक्या लवकर बदलणार नाही, हेही त्याला माहित आहे. कदाचित यामुळे तो कुठल्याही इव्हेंट वा मीटिंगमध्ये जाण्याचं टाळतो आहे.
पॉर्नोग्राफी प्रकरणी गेल्या 19 जुलैला मुंबई पोलिसांनी राजला अटक केली होती. सप्टेंबरमध्ये तो जामिनावर सुटला. पण प्रकरण संपलेलं नाही. शर्लिन चोप्रा तर अजूनही राजवर आरोप करत आहे. यादरम्यान शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राने शर्लिन चोप्राविरोधात 50 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला होता.  
 

Web Title: raj kundra has deleted his twitter instagram account after returning from 2 months of jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.