गणेश चतुर्थीच्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा बिझनेसमन पती राज कुंद्राने इंस्टाग्रामवर कमबॅक केलं. जवळपास 2 वर्षांनंतर राज कुंद्राने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला. त्याने चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर द्वेष करणाऱ्यांसाठी खास संदेशही लिहिला. या व्हिडीओमध्ये राज शिल्पा आणि मुलांसोबत गणपती बाप्पाची पूजा करताना दिसत आहे.
गणपती उत्सवाचा व्हिडिओ शेअर करताना त्याने इंस्टाग्राम कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'जय श्री गणेश, तो परत आला आहे. सर्व चाहत्यांच्या प्रेमाने मला मजबूत केले, तर सर्व द्वेष करणाऱ्यांमुळे मी आणखी जास्त मजबूत केलं. कर्म सर्वात महत्वाचे आहे, म्हणून मी धीर धरतोय. गणपती बाप्पा मोरया. गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा'. राजच्या या व्हिडीओवर पत्नी शिल्पा शेट्टी कुंद्रानेही प्रतिक्रिया दिली. कुटुंबाव्यतिरिक्त राजच्या चाहत्यांनी त्यांचं स्वागत केलं आहे.
शिल्पा शेट्टीच्या घरी दरवर्षी जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदाही शिल्पा शेट्टीने लाडक्या बाप्पाचं आगमन केलं होतं. दरम्यान, शिल्पा शेट्टीने २००९साली उद्योगपती राज कुंद्रासह लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्यांना दोन मुले आहेत. 'सुखी' या चित्रपटातून शिल्पा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
राज कुंद्रा याचं पॉर्नोग्राफी प्रकरण चांगलंच गाजलं. या प्रकरणी राज कुंद्राला तुरुंगातही जावं लागलं असून तुरुंगातून सुटल्यानंतर बराच काळ तो प्रसारमाध्यमांसमोर आला नाही. जेव्हापासून राजचं पॉर्नोग्राफी प्रकरण उघड झालं तेव्हापासून तो मास्क वापरु लागला आहे. त्यामुळे अनेकांनी त्याला ट्रोलही केलं आहे.