Join us

'जिजाजी छत पर हैं'मध्‍ये राजीव पांडेची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 7:15 AM

सोनी सबवरील हलकीफुलकी विनोदी मालिका 'जिजाजी छत पर हैं'ने विनोदी घटनांनी प्रेक्षकांना आकर्षून घेतले आहे.

सोनी सबवरील हलकीफुलकी विनोदी मालिका 'जिजाजी छत पर हैं'ने विनोदी घटनांनी प्रेक्षकांना आकर्षून घेतले आहे. ड्रामा व कॉमेडीमध्‍ये अधिक भर करत मालिकेने नवीन पात्र सादर केले आहे, तो म्‍हणजे छोटेचा (योगेश त्रिपाठी) भाऊ लोटे (राजीव पांडे).

लोटे हा व्‍यवसायाने मालिश करणारा असून तो त्‍याच्‍या व्‍यवसायामध्‍ये खूपच आळशी आहे. तो त्‍याचा भाऊ छोटेसोबत राहायला येतो. छोटेचे एक सलून आहे. लोटे चांदनी चौकमधील लोकांमध्‍ये मिसळून जातो आणि त्‍यांना मसाज देऊ लागतो. कामामध्‍ये फारसा चांगला नसलेला मुरारी (अनुप उपाध्‍याय) छोटेचा भाऊ असल्‍याने लोटेला सहन करतो आणि त्‍याला वाटते की, एक दिवस लोटेला चांगला मसाज कशाप्रकारे द्यावा हे समजेल. कोणालाच माहित नसते की, लोटेची नजर पंचमच्‍या (निखिल खुराणा) नोकरीवर असते आणि त्‍याला मुरारीच्‍या दुकानामध्‍ये सेल्‍समन बनायचे असते. लोटेच्‍या पंचमची नोकरी मिळण्‍याच्‍या प्रयत्‍नांला कोणते वळण मिळते, हे पाहणे निश्चितच मनोरंजनपूर्ण असेल.राजीव पांडे म्‍हणाला, 'मी यापूर्वी देखील सोनी सबवर काम केले आहे आणि पुन्‍हा एकदा सब परिवाराचा भाग होताना खूप आनंद होत आहे. 'जिजाजी छत पर हैं'मध्‍ये मी लोटेची भूमिका साकारत आहे. ही भूमिका मालिकेमध्‍ये पुढे विनोदी व अनपेक्षित वळण आणणार आहे. सर्व कलाकारांसोबत शूटिंग करताना खूप मजा येत आहे. सर्व कलाकार अत्‍यंत प्रतिभावान व मेहनती आहेत. एकप्रेक्षक म्‍हणून मला जिजाजी छत पर हैं मालिका पाहायला आवडते. मी आशा करतो की, प्रेक्षक माझ्या इतर भूमिकांप्रमाणेच लोटेच्‍या भूमिकेला देखील तितकेच प्रेम देतील आणि तिचे कौतुक करतील.'

टॅग्स :जिजाजी छत पर है