Join us

राजेश व मिलिंदची भूमिकांची अदलाबदल!

By admin | Published: October 29, 2015 11:11 PM

अनेक नाटकांचा लेखक म्हणून राजेश देशपांडे याची ओळख आहे. त्याचप्रमाणे अभिनयाचे दमदार नाणे वाजवणारा म्हणून मिलिंद शिंदे याचे नाव घेतले जाते

अनेक नाटकांचा लेखक म्हणून राजेश देशपांडे याची ओळख आहे. त्याचप्रमाणे अभिनयाचे दमदार नाणे वाजवणारा म्हणून मिलिंद शिंदे याचे नाव घेतले जाते. पण, आता या दोघांनी आपापल्या भूमिकांची अदलाबदल केली आहे. लेखणी सोडून राजेशने अभिनयाचा डाव मांडला आहे; तर मिलिंदने नाटकासाठी लेखणी हाती धरली आहे. आत्ताच रंगभूमीवर आलेल्या 'स्पिरीट' या नाटकात राजेश देशपांडे चक्क भूमिका रंगवत आहे. तब्बल बारा वर्षांनी तो नाटकात दिसत आहे. तर, मिलिंद शिंदे याने 'अबीर गुलाल' या नाटकाचे लेखन करत नाटककाराचा जिरेटोप डोईवर चढवला आहे. पहिल्यांदाच मिलिंदने नाटक लिहिले आहे. विशेष म्हणजे, अशोक शिगवण हेच या दोन्ही नाटकांचे निर्माते आहेत. अकरा कलावंतांची टीम असलेल्या 'स्पिरीट' या नाटकाचे दिग्दर्शन विजय निकम यांचे असून, 'अबीर गुलाल'साठी चौदा कलावंतांचा ताफा घेत विजय सातपुते यांनी दिग्दर्शकीय सुकाणू हाती धरले आहे.