27 वर्ष राजेश खन्नापासून वेगळी राहिली डिंपल कपाडिया, सनी देओलमुळे घेतला नाही घटस्फोट!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 09:28 AM2023-02-21T09:28:19+5:302023-02-21T09:33:01+5:30
Dimple Kapadia - Sunny Deol : डिंपल कपाडियाला बॉलिवूडमधील बिनधास्त हिरोईन म्हणून ओळखलं जातं. डिंपलने नेहमीच तिच्या पसंतीनुसार सिनेमे केले. डिंपलला आधीपासून राजेख खन्ना खूप आवडचे.
Dimple Kapadia - Sunny Deol : बॉलिवूडमध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यात लग्नानंतरही हिरो किंवा हिरोईन आपल्या सहकलाकाराच्या प्रेमात पडले. या अफेयर्सची चर्चा नेहमीच होत असते. अशीच एक 80 च्या दशकातील लव्हस्टोरी खूप फेमस होती. ही लव्हस्टोरी होती सनी देओल आणि डिंपल कपाडियाची. आजही या जोडीबाबत चर्चा केली जाते.
डिंपल कपाडियाला बॉलिवूडमधील बिनधास्त हिरोईन म्हणून ओळखलं जातं. डिंपलने नेहमीच तिच्या पसंतीनुसार सिनेमे केले. डिंपलला आधीपासून राजेख खन्ना खूप आवडचे. जेव्हा त्यांना भेटली तेव्हा त्यांच्याकडे आकर्षित झाली. डिंपल केवळ 15 वर्षांची असताना तिने राजेश खन्नासोबत लग्न केलं होतं.
डिंपल आणि राजेश खन्ना यांना दोन मुली आहेत. डिंपलने लग्नानंतर करिअरला ब्रेक दिला होता. पण काही काळाने तिचा राजेश खन्ना यांच्यासोबत वाद झाला. दहा वर्ष सोबत राहिल्यानंतर 1982 मध्ये ती राजेश खन्नापासून वेगळी राहू लागली होती. दोघांनी घटस्फोट घेतला नाही. मीडिया रिपोर्टनुसार, टीना मुनीममुळे डिंपल आणि राजेश खन्ना यांच्यात दरी वाढली होती.
बॉलिवूडमध्ये राजेश खन्ना यांनी एक काळ गाजवला. त्यांना बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार मानलं जातं. जेव्हा डिंपलसोबत त्यांचं लग्न झालं तेव्हा तिच्यापासून सगळेच दूर गेले. त्यांना भीती होती की, राजेश खन्ना यांची नाराजी ओढवून घेतली तर करिअर संपेल.
अशात सनी देओलने डिंपलसोबत काम केलं. इतकंच नाही तर डिंपलसोबत त्याने बोल्ड सीनही दिले. ‘आग का गोला’, ‘मंजिल मंजिल’ सारख्या सिनेमांमध्ये काम करताना दोघे जवळ आले. दोघांच्या प्रेमाची चर्चा रंगली होती. दोघांचीही लग्न झाली होती. सनी पत्नीला सोडायला तयार नव्हता. पण डिंपल आणि सनीचं प्रेम आजही कायम आहे.