‘फॅन्ड्री’ हा सिनेमा म्हणजे नागराज मंजुळे यांची अप्रतिम कलाकृती आहे. समाजाचे वास्तव मांडणाऱ्या या सिनेमाने प्रेक्षक आणि समीक्षक सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटात काम करणारेही अस्सल ग्रामीण बाज असलेले कलाकार होते. सोलापूर जिल्ह्यातील सोमनाथ अवघडे याने चित्रपटात जब्याची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली होती. तर अभिनेत्री म्हणून नागराज यांनी राजेश्वरी खरात हिची निवड केली होती. तिने साकारलेली शालूची भूमिकाही प्रचंड गाजली होती़. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव, तिचा सहजसुंदर अभिनय चाहत्यांना भावला होता.
राजेश्वरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअऱ करत असते. तिने शेअर केलेल्या एका व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या व्हिडिओत ती शेतात फिरताना दिसत असून तिने नारंगी रंगाची साडी नेसली आहे. साडीत ती खूपच सुंदर दिसत असून तिचे हे रूप तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.
या व्हिडिओसोबत तिने लिहिले आहे की, आजोबा जेव्हा हयात होते तेव्हा एके काळी मी शेतात आले होते, त्यानंतर आज बर्याच काळानंतर मी येथे गावी आली आहे. शेतात फिरल्याने आजोबांसोबतच्या बर्याच आठवणी जागी झाल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून लाखोहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे तर हजारो लोकांनी या व्हिडिओवर कमेंट केली आहे.
राजेश्वरी खरातला नागराज यांनी पहिल्यांदा पुण्यात पाहिले होते. फॅन्ड्रीसाठी तिचा एकच चेहरा नागराज यांच्या डोळ्यांपुढे येत होता. पण तिचा शोध लागेना. अनेक प्रयत्नानंतर तिचा शोध लागला. पण पोरीला चित्रपटात काम करू देण्यास तिचे आईवडील तयार होईनात. नागराज यांनी बरीच समजूत काढल्यानंतर राजेश्वरीच्या आईवडिलांनी परवानगी दिली आणि राजेश्वरी कॅमे-यापुढे उभी झाली.
फॅन्ड्रीनंतर राजेश्वरीचा ‘अॅटमगिरी’ हा सिनेमा आला होता. राजेश्वरी तिच्या कुटुंबासोबत सध्या पुण्यात राहते. ख-या आयुष्यात राजेश्वरी प्रचंड ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय आहे. अभिनयाचा कुठलाही वारसा नसताना मराठी चित्रपट सृष्टीमध्ये तिने अफलातून यश मिळवले आहे.