एकीकडे साऊथ सुपरस्टार रजनीकांत आणि दुसरीकडे बॉलिवूड सुपरस्टार सनी देओलने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातलाय. १० ऑगस्ट रजनीकांतचा 'जेलर' सिनेमा रिलीज झाला तर ११ ऑगस्टला सनीचा 'गदर 2' रिलीज झाला. दोन्ही सिनेमांनी कोट्यवधी रुपये कमवत सिनेइंडस्ट्री दणाणून सोडली आहे. रजनीकांतच्या चाहत्यांनी लाडक्या अभिनेत्याचा सिनेमा तब्बल ५०० कोटी पार नेला आहे. १० च दिवसात जेलरने भारतात ३०० कोटींची कमाई केली आहे. तर जगभर सिनेमाने ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे.
'जेलर' सिनेमातील तमन्ना भाटियाचं 'कावला' हे गाणं चांगलंच गाजलं. १० ऑगस्टला रिलीज झालेला सिनेमाचा अजूनही डंका आहे. भारतात ३०० कोटी पर्यंत कलेक्शन पोहोचलं आहे तर जगात सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. ट्रेड अॅनालिस्टनुसार,'जेलरने १० व्या दिवशी १८ कोटींचा व्यवसाय केला.यासोबतच सिनेमाने भारतात 263.90 कोटी कमावले आहेत. तर जगात सिनेमाने ५०० कोटींचा धंदा केलाय. आता विकेंडच्या दुसऱ्या दिवशी सिनेमाचं एकूण कलेक्शन किती होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
२ वर्षांनंतर रजनीचं पुनरागमन
रजनीकांतने जेलरमधून २ वर्षांनी पुनरागमन केलं. रजनीकांतची जादू कमी झालेली नाही हेच यातून दिसतं. रजनीकांतचा हा सर्वाधिक कमाई करणारा तिसरा सिनेमा बनला आहे. या सिनेमाने 'पोन्नियन सेल्व्हन २','विक्रम', 'बाहुबली' या सिनेमांनाही मागे टाकलं आहे.