दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आगामी चित्रपट अन्नाथेचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर रुटीन मेडिकल चेकअपसाठी अमेरिकेला रवाना झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, रजनीकांत अमेरिकेतील डॉक्टर्ससोबत जनरल हेल्थ चेकअप करणार आहेत. त्यासाठी त्यांना काही आठवडे युएसमध्ये राहावे लागणार आहे. यादरम्यान रजनीकांत यांच्या बऱ्याच टेस्ट केल्या जाणार आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे रजनीकांत यांनी वैद्यकीय चाचण्यांसाठी विशेष विमानाने अमेरिकेला जाण्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली होती आणि आता त्यांना परवानगी देण्यात आली आहे. अशात ते अमेरिकेत मेडिकल चेकअप करणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार रजनीकांत विशेष विमानाने अमेरिकेसाठी रवाना झाले आहेत.काही वर्षांपूर्वी रजनीकांत यांची किडनीची सर्जरी झाली होती. ज्या डॉक्टरांनी रजनीकांत यांची सर्जरी केली होती तेच अमेरिकेत त्यांचे मेडिकल चेकअप करणार आहेत. २०२० साली डिसेंबर महिन्यात रजनीकांत यांच्या ब्लड प्रेशरची समस्या उद्भवली होती. त्यामुळे त्यांना काही दिवस रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते. त्यानंतर त्यांनी राजकारणातून ब्रेक घेण्याचा आणि आपल्या तब्येतीवर लक्ष देण्याबद्दल म्हटले होते. आता ते चार्टर्ज प्लेनने अमेरिकेला रवाना झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार ते ८ जुलैला भारतात परतण्याची शक्यता आहे.