Rajinikanth Highest Paid Actor Of India: गेल्या काही वर्षांमध्ये एका पाठोपाठ एक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर सुपरस्टार रजनीकांत यांनी 'जेलर' चित्रपटातून दमदार कमबॅक केले. 10 ऑगस्ट रोजी रिलीज झालेला 'जेलर' अजूनही चित्रपटगृहात सुरू असू, चित्रपटाने जगभरात 600 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. दरम्यान, चित्रपटासाठी रजनीकांत यांनी घेतलेल्या फीबाबत एक मोठा खुलासा झाला आहे.
फिल्म इंडस्ट्री ट्रेड अॅनालिस्ट मनोबाला विजयन यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन रजनीकांत यांच्या फीबाबत माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी रजनीकांत यांचा फोटो शेअर करत लिहिले की, ‘जेलर चित्रपटाचे निर्माते कलानिधी मारन यांनी रजनीकांत यांना दिलेला चेक 100 कोटींचा असल्याचे कळले आहे. हा चेक जेलरच्या नफ्यातील वाटा आहे. यापूर्वीच रजनीकांत यांना चित्रपटासाठी 110 कोटी रुपये फी मिळाली आहे. म्हणजेच, रजनीकांत यांना जेलरसाठी एकूण 210 कोटी रुपये मिळाले आहेत. यासोबतच रजनीकांत देशातील सर्वात महागडे अभिनेते झाले आहेत.'
चित्रपटाचे निर्माते कलानिधी मारन यांनी चित्रपटाच्या यशाने खुश होऊन सुपरस्टार रजनीकांत यांना आलिशान BMW गाडी भेट दिली आहे. पाहा व्हिडिओ:-
चित्रपटाची कमाई किती?नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित जेलरने जबरदस्त कमाई केली आहे. जेलरने आतापर्यंत भारतात तब्बल 328.20 कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर चित्रपटाने जगभरात 600 कोटींचा व्यवसाय केला आहे. रजनीकांत व्यतिरिक्त या चित्रपटात तमन्ना भाटिया, रम्या कृष्णन, वसंत रवी आणि विनायकन महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. मोहनलाल, जॅकी श्रॉफ आणि शिवा राजकुमार यांचा दमदार कॅमिओ आहे.