रजनीकांत सध्या त्यांच्या आगामी सिनेमा 'जेलर'ला घेऊन चर्चेत आहे. रजनीकांत यांचा 'जेलर' रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, त्यांनी स्वत:साठी वेळ काढून सुट्टीसाठी मालदीव गाठलं होतं. रजनीकांत यांचं तिथं भव्य स्वागत करण्यात आलं, ज्याचा व्हिडिओ होतो आहे. चित्रपटाच्या ऑडिओ लॉन्चसाठी ते आता चेन्नईला परतले आहे.
रजनीकांत मालदीवमध्ये एका आलिशान रिसॉर्टमध्ये थांबलं होतं. रजनीकांत यांच्या रिसॉर्टमधील ग्रँड वेलकमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यामध्ये रजनीकांत हे बोटीतून रिसॉर्टमध्ये पोहोचताच ढोल वाजवण्यात आले, त्यांच्या मार्गावर गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या टाकण्यात आल्या. 'थलायवा' यांनीही हात जोडून सर्वांचे आभार मानले. यावेळी ते खूप आनंदी दिसत होते.
मालदीवमधून परतत असताना रजनीकांत श्रीलंकन एअरलाइन्सच्या विमानात चढले. त्यांनी ट्विटरवर सुपरस्टारची फोटो ट्विटसह पोस्ट केली ज्यात लिहिले आहे की, "सुपरस्टार ऑनबोर्ड! मालदीव ते चेन्नई या प्रवासात रजनीकांत यांचे स्वागत करताना आम्ही अत्यंत रोमांचित आहोत."
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रजनीकांत 'जेलर' चित्रपटात दिसणार आहेत. या सिनेमात तमन्ना भाटिया, मोहनलाल, सनी, जॅकी श्रॉफ, रम्या कृष्णन यांच्यासह अनेक स्टार्स आहेत. नेल्सन दिलीपकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. रजनीकांत यांचा 'जेलर' याआधी ११ ऑगस्टला रिलीज होणार होता. परंतु, चिरंजीवींच्या भोला शंकर, आणि सनी देओलच्या गदर २ सोबत टक्कर टाळण्यासाठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. आता सुपरस्टार रजनीकांत यांचा चित्रपट १० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.