अभिनेता राजकुमार रावने हिंदी चित्रपटात विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. आता राजकुमार अभिनेता सुनील ग्रोव्हरसोबत छोट्या पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. तो स्टार प्लस वाहिनीवरील कानपूरवाले खुराणाज या शोमध्ये दिसणार आहे. या कार्यक्रमातील प्रमुख कलाकार सुनील ग्रोव्हरसोबत राजकुमारराव प्रेक्षकांची खळखळून हसविणार आहे. या कार्यक्रमाशी जवळून संबंधित असलेल्या एका सूत्राने सांगितले, “या भागात इतके धमाल प्रसंग आहेत की तो नक्कीच एक संस्मरणीय कार्यक्रम होईल. या भागात राजकुमार रावने आपले काही वैयक्तिक किस्से सांगितले असून अभिनेता म्हणून प्रस्थापित होण्यापूर्वीच्या काही घटनांचीही त्याने माहिती दिली आहे. या कार्यक्रमात त्याने फराह खान, सुनीलआणि अपारशक्ती यांच्याबरोबर आपल्या कमरिया या लोकप्रिय गाण्यावर नृत्यही केले असून काही मजेदार नकला आणि संभाषणही केले आहे. आपण पत्रलेखावर आपली छाप पाडून तिला कसे वश केले त्याचा किस्साही राजकुमारने सांगितला.”
सुनील ग्रोव्हरसोबत राजकुमार रावने केली धमाल, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 19:52 IST
आता राजकुमार अभिनेता सुनील ग्रोव्हरसोबत छोट्या पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे.
सुनील ग्रोव्हरसोबत राजकुमार रावने केली धमाल, जाणून घ्या याबद्दल
ठळक मुद्देराजकुमार राव कानपुरवाले खुराणाज शोमध्ये लावणार हजेरी