मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' चित्रपटाचे दीपिका पादुकोण व विक्रांत मेस्सी चित्रीकरण करत आहे. विक्रांत मेस्सीच्या जागी आधी बॉलिवूडमधील एका दुसऱ्या अभिनेत्याची वर्णी लागली होती. हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून अभिनेता राजकुमार राव होता.
एका मुलाखतीत राजकुमारने सांगितले की, मेघना गुलजारच्या छपाक चित्रपटात त्यांची पहिली पसंती स्वतः तो होता. पण, राजकुमार राव त्या आधीच दुसऱ्या कोणत्या तरी सिनेमाला तारखा दिल्या होत्या. त्यामुळे पण त्याला या चित्रपटात काम करायची असतानादेखील हा सिनेमा सोडावा लागला. त्यानंतर ही भूमिका विक्रांत मेस्सीला देण्यात आली.
तर विक्रांत लक्ष्मीचा लिव्ह इन पार्टनर आलोक दीक्षितच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. विक्रांत आणि दीपिकाची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना कितपत भावते, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.
सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू असून हा सिनेमा १० जानेवारी २०२०ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.