Join us

बॉलिवूडमध्ये येण्याआधी हा अभिनेता द्यायचा शाळेत विद्यार्थ्यांना धडे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 7:15 AM

बॉलिवू़डमध्ये पदार्पण करण्यापूर्वी हा अभिनेता एका शाळेत विद्यार्थ्यांना शिकवायचा

अभिनेता राजकुमार रावने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर, आता आपला आगामी चित्रपट छलांगसोबत सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी सज्ज झाला आहे 

राजकुमार राव छलांग या चित्रपटात एका शाळा शिक्षकाची भूमिका निभावताना दिसणार आहे. परंतु हा अभिनेता वास्तविक आयुष्यात देखील शिक्षक होता, हे फार कमी लोकांना माहित असेल. बॉलिवूडमध्ये येण्याआधी, राजकुमार एका शाळेत शिक्षक होता आणि आपल्या छलांग या चित्रपटात खऱ्या आयुष्यातील शिक्षकी पेशाला मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी तयार झाला आहे. 

याविषयी राजकुमार राव म्हणाला की,"मी माझ्या ग्रॅजुएशनच्या दरम्यान ३ महीने ड्रामेटिक्स शिकवत होतो आणि या तीन महिन्यांत मी एका नाटकाचे दिग्दर्शन देखील केले होते. यावेळी मी शिक्षकापेक्षा विद्यार्थ्यांचा मित्रच अधिक होतो. कारण त्यांच्या आणि माझ्यामध्ये वयाचे अंतर फार कमी होते. मी नवे नवे अभिनय तंत्र शोधण्यासाठी नेहमीच उत्साहित असायचो आणि त्या दिवसांमध्ये शिकण्याचा रोमांचक अनुभव घेत होतो."

"छलांग" मध्ये राजकुमार राव आणि नुसरत भरूचा यांची जोडी पाहायला मिळणार आहे. ही एक उत्तर भारतातील निम-सरकारी शाळेच्या पीटी शिक्षकाची प्रेरणादायी कहाणी आहे. मोंटू (राजकुमार राव) एक विशिष्ट पीटी शिक्षक आहे, ज्याच्यासाठी हे निव्वळ एक काम आहे मात्र, जेव्हा परिस्थिती मोंटूचे सर्व काही पणाला लावतो. ज्यात नुसरत भरूचा साकारत असलेली नीलूचा देखील समावेश आहे, जी त्याची प्रेयसी आहे. मोंटूला ते करण्यास भाग पाडते जे त्याने कधीच  केलेले नाही आणि ते काम म्हणजे 'शिकणे'. 

चित्रपट 'छलांग'मधील मोंटूच्या प्रवासातून शाळेतील खेळ या विषयाला विनोदी पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न केला आहे.

हंसल मेहता दिग्दर्शित लव रंजन, असीम अरोरा आणि जिशान क्वाड्री द्वारा लिखित छलांग चित्रपटाची निर्मिती अजय देवगन, लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी केली आहे.

टॅग्स :राजकुमार रावनुसरत भारूचा