बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) त्याची विनोदी शैली आणि अभिनयामुळे प्रसिद्ध आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'भूल भुलैया-2' मध्येही त्याची पंडितची भूमिका चांगलीच पसंतीस उतरली होती. मात्र, आता तो कायदेशीर अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. या अभिनेत्यावर २० लाखांची फसवणूक (Fraud) केल्याचा आरोप आहे, त्यानंतर इंदूर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध नोटीस (Notice) जारी केली आहे. 15 दिवसांत अभिनेत्याला पोलिसांसमोर हजर व्हावे लागेल, असे सांगण्यात आले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुरिंदर सिंग नावाच्या एका बिल्डरने अभिनेता राजपाल यादवविरोधात पोलिसात तक्रार दिली होती. आपल्या मुलाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाठिंबा देण्यासाठी अभिनेत्याने 20 लाख रुपये घेतल्याचे सांगण्यात आले. पण अभिनेत्याने असे काहीही केले नाही. याउलट सुरिंदर त्याच्याकडे पैसे मागण्यासाठी गेला, तेव्हा राजपाल यादव गायब झाला. त्याने फोन उचलणेही बंद केले. पैसे परत न मिळाल्याने त्रस्त झालेल्या बिल्डरने अभिनेत्यावर गुन्हा दाखल केला. तुकोगंज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली. राजपाल यादव यांना १५ दिवसांत हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.अभिनेता राजपाल यादवसाठी हे काही पहिले प्रकरण नाही. २०१० मध्ये राजपाल यादव एका चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होते. त्याचे नाव 'मिसिंग अॅड्रेस' असे होते. ते करण्यासाठी त्यांनी एका व्यक्तीकडून ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते आणि लवकरच परत येण्याचे आश्वासन दिले. मात्र, ही रक्कम देता येत नसल्याने कर्ज देणार्या व्यक्तीने न्यायालयात धाव घेतली. तेथे राजपाल यादव १० कोटी ४० लाखांची रक्कम व्याजासह परत करणार असल्याचे ठरले. कोर्टाने फटकारल्यानंतरही राजपाल यादवने ते पैसे दिले नाहीत. चेक दिला पण तोही बाऊन्स झाला. यानंतर न्यायालयाने त्यांना तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले. मात्र, नंतर त्याला जामीनही मंजूर झाला.