Join us

Raju Srivastav : '...धन्यवाद अमिताभ अंकल', बिग बींच्या नावे राजू श्रीवास्तव यांच्या मुलीची भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 9:16 PM

42 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर राजू श्रीवास्तव यांचे 21 सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या मुलीने अमिताभ बच्चन यांच्यासाठी एक खास पोस्ट केली आहे.

Raju Srivastav News: 42 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांचे 21 सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्याने चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली. बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीही राजू यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. आता राजू यांच्या मुलीने बिग बींचे पाठिंब्यासाठी आभार मानले आहेत.

राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा श्रीवास्तवने राजूच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. तसेच, अमिताभ बच्चन यांनी राजूसाठी लिहिलेला ब्लॉगचा फोटोही शेअर केला आहे. त्यात अमिताभ यांनी राजूच्या मृत्यूवर एक मित्र आणि चांगला कलाकार गमावण्याची भावना व्यक्त केली होती. तिसऱ्या फोटोमध्ये राजू आणि अमिताभ एका शोच्या स्टेजवर आहेत. तर चौथ्या फोटोत राजू श्रीवास्तव आणि त्यांचे कुटुंबीय बिग बींसोबत उभे आहे.

फोटो शेअर करत अंतरा लिहिते, 'या कठीण काळात आम्हाला साथ दिल्याबद्दल अमिताभ बच्चन अंकल यांचे आभार मानू इच्छिते. तुमच्या प्रार्थनेने आम्हाला खूप बळ आणि आधार दिला. तुम्ही माझ्या वडिलांचे प्रेरणास्त्रोत आणि मार्गदर्शक होतात. जेव्हापासून माझ्या वडिलांनी तुम्हाला मोठ्या पडद्यावर पाहिले, तेव्हापासून तूम्ही त्यांच्यासोबत होतात. त्यांनी तुम्हाला फक्त ऑनस्क्रीनच नाही, तर ऑफस्क्रीनवरही फॉलो केले.'

गुरुजींच्या नावाने नंबर सेव्ह होताअंतराने पुढे लिहिले की, 'त्यांनी तुमचा नंबर 'गुरुजी' म्हणून फोनमध्ये सेव्ह केला होता. तुम्ही पप्पांच्या आत होता. तुम्ही पाठवलेल्या ऑडिओवरील त्यांनी हालचाल करणे, यातून समजते की, तुम्ही त्यांच्यासाठी खूप काही होता. आई शिखा, भाऊ आयुष्मान, माझे संपूर्ण कुटुंब, मी मनापासून तुमची ऋणी आहे. त्यांना जगभर प्रेम आणि स्तुती मिळाली, ती तुमच्यामुळेच. धन्यवाद.'

42 दिवसांची झुंज अपयशी10 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांना दिल्लीतील एका हॉटेलच्या जिममध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांना एम्स हॉस्पिटलमध्ये भरी केले. 42 दिवस राजूवर उपचार सुरू होते. यादरम्यान अमिताभ बच्चन यांनी त्यांचा आवाज रेकॉर्ड करून त्यांना एक संदेश पाठवला होता. त्यामुळे त्यांच्या शरीरात काही हालचालही झाली होती. राजूच्या मृत्यूनंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या स्मरणार्थ एक दीर्घ पोस्ट लिहिली होती.

टॅग्स :राजू श्रीवास्तवअमिताभ बच्चन