Raju Srivastava Health: राजू श्रीवास्तव यांची हेल्थ अपडेट आली समोर, प्रकृती अजूनही चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 11:24 AM2022-08-12T11:24:30+5:302022-08-12T17:56:15+5:30
Raju Srivastava Health Update : राजू श्रीवास्तव सध्या व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.जगभरातील चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत.
Raju Srivastava Health Update :राजू श्रीवास्तव अजूनही दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात जीवन आणि मृत्यू यांच्याशी झुंज देत आहेत. टीव्ही इंडस्ट्रीतील राजू श्रीवास्तव यांच्या ताज्या हेल्थ अपडेटसमोर आली आहे.राजू श्रीवास्तव यांचे संपूर्ण कुटुंब सध्या रुग्णालयात रात्रंदिवस उभे आहे आणि जगभरातील चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. २४ तासांनंतरही राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक आहे.
प्रकृती चिंत्ताजनक
AIIMSकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांना ब्रेन स्ट्रोक आला आहे. सध्या ते व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती जशी होती तशीच असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नाही.
राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा हिने सांगितले की, "त्यांच्या प्रकृती अजूनही गंभीर आहे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यापासून ते ICUमध्ये आहेत. आयसीयूमध्येच डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. त्याची प्रकृती सुधारली नाही किंवा बिघडलेली नाही. डॉक्टरांची संपूर्ण टीम प्रयत्न करतेय. आम्ही फक्त प्रार्थना करत आहोत आणि आशा करतो की ते लवकर बरे होतील. सध्या माझी आई त्यांच्यासोबत ICU मध्ये आहे.
१० ऑगस्टला जीममध्ये ट्रेडमिलवर धावत असताना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर राजू श्रीवास्तव बेशुद्ध झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना इमर्जन्सी मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं.