राकेश बापट - अनुजा साठे करताहेत ‘व्हॉट्सॲप लव’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 06:30 AM2019-01-30T06:30:00+5:302019-01-30T06:30:00+5:30

हिंदी आणि मराठी दोन्ही मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाने स्वतंत्रपणे नाव कमावलेले हॅन्डसम हंक राकेश बापट आणि अभिनेत्री अनुजा साठे हे दोघे ‘व्हॉट्सॲप लव’ बंधनात अडकणार आहेत.

Rakesh Bapat - Anuja Sathe is doing 'What's Love' | राकेश बापट - अनुजा साठे करताहेत ‘व्हॉट्सॲप लव’

राकेश बापट - अनुजा साठे करताहेत ‘व्हॉट्सॲप लव’

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘व्हॉट्सॲप लव’ मराठी चित्रपट येत्या ५ एप्रिल रोजी होणार प्रदर्शित ‘व्हॉट्सॲप लव’चा पहिला पोस्टर झाला प्रदर्शित

हिंदी आणि मराठी दोन्ही मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाने स्वतंत्रपणे नाव कमावलेले हॅन्डसम हंक राकेश बापट आणि अभिनेत्री अनुजा साठे हे दोघे ‘व्हॉट्सॲप लव’ बंधनात अडकणार आहेत. येत्या ५ एप्रिल रोजी त्यांचा ‘व्हॉट्सॲप लव’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हीजनवर प्रेक्षकांची पसंती मिळविलेले हे दोन्ही कलाकार मातृभाषा मराठी चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. कॉन्सर्ट किंग म्हणून संगीतविश्वात ओळखले जाणारे हेमंतकुमार महाले यांची कथा, दिग्दर्शन आणि निर्मिती असलेल्या ‘व्हॉट्सॲप लव’ ह्या चित्रपटाचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

व्हॉट्सॲप लव ह्या चित्रपटाची कथा ही सध्या जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात ह्या न त्या मार्गाने घडत आहे. कृत्रिम संबंध, भावभावना जोपासताना तारेवरची होणारी कसरत आणि भौतिक सुखाचा माग घेताना सांडत चाललेला खरेपणा आणि आलेले एकाकीपण नव्या संपर्क यंत्रणेच्या माध्यमातून कसे घडते, हे चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आहे. हा सिनेमा हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत बनवला आहे. आणि व्हॉट्सॲप वापरणाऱ्या प्रत्येकाला हा चित्रपट पाहून आनंद होईल, याची मला खात्री आहे” असे कथालेखक, दिग्दर्शक आणि निर्माता हेमन्तकुमार महाले यांनी सांगितले.


व्हॉट्सॲप हा सध्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. केवळ व्हॉट्सॲप वरून सर्वांशी संपर्कात राहाता येत असल्याने युवकांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आलेत. व्हॉट्सॲप वरून आलेल्या संदेशातील भावभावनांचा ओलावा किंवा शब्दांमागील भावार्थ ज्याच्या त्याच्या समजण्यावर अवलंबुन असतो. त्यामुळे अनेक समज - गैरसमज निर्माण होतात आणि पुढे प्रसरण पावतात. पण, थेट संवाद साधण्यासाठी न धजावणाऱ्या व्यक्तिलाही आपल्या भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं अधिक सोपे वाटू लागल्याने प्रेम प्रकरणात व्हॉट्सॲप मध्यस्थाची भूमिका पार पाडत आहे. पण, ‘व्हॉट्सॲप लव’ ह्या सिनेमाची व्हॉट्सॲप लव्हस्टोरी नेमकी काय आहे? हे फक्त राकेश बापट आणि अनुजा साठे ह्या दोघांनाच माहिती. त्यामुळे हे व्हॉट्सॲप लव प्रकरण जाणून घेण्यासाठी हेमंतकुमार म्युझिकल ग्रुपची निर्मिती असलेला व्हॉट्सॲप लव ह्या चित्रपटाची ५ एप्रिल पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. हा चित्रपट ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर सुरेश सुवर्णा यांच्या कॅमेऱ्याने टीपला असून पिकल एंटरटेनमेन्टचे समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी हे वितरणाची धुरा वाहणार आहेत.

Web Title: Rakesh Bapat - Anuja Sathe is doing 'What's Love'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.