हृतिक रोशन आज बॉलिवूडमधील यशस्वी कलाकारांपैकी एक आहे आणि जगभरात त्याला फॅन फॉलोईंग आहे, पण सुरुवातीला तसे नव्हते. 2000 मध्ये 'कहो ना प्यार है' सिनेामाव्दारे त्याने शानदार पदार्पण केल्यानंतर हृतिक इतका नाराज झाला होता की, तो रडला. त्याने आपले वडील राकेश रोशन यांना काम करू शकत नसल्याचे सांगितले.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीच्या दरम्यान राकेश रोशन यांनी आठवणींना उजाळा देताना सांगितले की, ब्लॉकबस्टर डेब्यू केल्यानंतर ह्रतिक त्याच्या खोलीत 5 दिवस रडताना पाहिले. एका रात्रीत स्टार झाल्यानंतर ह्रतिकला स्वतःचा अभिमान असायला हवा होता, मात्र त्यावेळी तो विचार करत होतो की त्याचा बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय योग्य घेतला आहे का?
राकेश रोशन म्हणाले, 'मला आठवते ह्रतिकचा सिनेमा रिलीज झाल्यानंतर तो त्याच्या खोलीत रडत होता. तो म्हणत होता की मी हे हँडल करु शकत नाही. मी काम करू शकत नाही, मी स्टुडिओला जाऊ शकत नाही. मुली आणि मुलांनी भरलेल्या बस मला भेटायला येत आहेत. मला शिकण्याची, अभिनय करण्याची, कामावर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळत नाही. प्रत्येकाला मला भेटायचं आहे. '
राकेशने यांनी दिला होता मोल्लाचा सल्ला यानंतर राकेश यांनी मुलाला असा सल्ला दिला की त्याने आयुष्यातील कोणताही बदल ओझे म्हणून घेऊ नये तर मोकळ्या मनाने स्वीकारावेत. 'कहो ना प्यार है' ने सिनेमाने 2020 मध्ये 20 वर्षे पूर्ण केली आहेत.