Join us

कधीही माझ्यासमोर येऊ नकोस नाहीतर..., रितेशची राखी सावंतला थेट धमकी...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2022 1:22 PM

Rakhi Sawant Ritesh Singh War : होय, राखी व रितेश यांच्यात सोशल मीडियावर चांगलंच भांडण जुंपलं आहे. केवळ भांडण नाही तर रितेशने थेट राखीला धमकीच दिली आहे.

Rakhi Sawant Ritesh Singh War : ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) या ना त्या कारणाने सतत चर्चेत असते. सध्या ती तिचा पती राकेशमुळे (Ritesh Singh) चर्चेत आहे. होय, राखी व रितेश यांच्यात सोशल मीडियावर चांगलंच भांडण जुंपलं आहे. केवळ भांडण नाही तर रितेशने थेट राखीला धमकीच दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच राखीने पती रितेशपासून वेगळं होत असल्याची घोषणा केली होती. पण राखीपासून वेगळं झाल्यानंतरही रितेश राखीचे फोटो सतत पोस्ट करत असतो. रितेशने नुकताच इन्स्टाग्रामवर राखीचा एक फोटो शेअर केला आणि सोबत एक कॅप्शनही.‘राखीजी सिंपल सजेशन आहे. कोणत्याही गेम शोमध्ये तू कधीही माझ्यासमोर येऊ नकोस. नाहीतर मी तुझा असा बँड वाजवेन की तू पुन्हा कोणत्याही शोला जाऊ शकणार नाहीस.  बिग बॉस 15 च्या वाईल्ड कार्डचं काय झालं ते आठवतं का? त्यामुळे जस्ट कूल,’असं त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं.

रितेशची ही धमकी वाचून राखी गप्प थोडीच बसणार? तिनेही त्याला जोरदार उत्तर दिलं. यानंतर काय तर कमेंट सेक्शनमध्ये दोघांमध्ये चांगलीच जुंपली. ‘तुझा ड्रामा बंद कर,’असं तिने लिहिलं. यावर रितेशने, ‘तूच ड्रामा क्वीन आहेस,’ अशा शब्दांत उत्तर दिलं. यानंतर राखीने रितेशला तिचा फोटो न वापरण्याची तंबी दिली. यावरही रितेशने लगेच उत्तर दिलं. मॅडम, तुम्ही माझा फोटो वापरणं बंद करा, मी तुमचा फोटो वापरणं बंद करतो. एखाद्या गेम शोमध्ये तुम्ही भेटा, मग दाखवतो.बँड कशी वाजवली जाते, तुम्हाला कळेल..., अशी धमकीच त्याने राखीला दिली.

  राखी आणि रितेशचं  सोशल मीडियावरच्या भांडणाची सध्या इंटरनेटवर चांगलीच चर्चा आहे.  या भांडणातत रितेशच्या चाहत्यांनी त्याची बाजू घेतली आहे तर राखीच्या चाहत्यांनी रितेशला ट्रोल करायला सुरूवात केली आहे.

काही दिवसांपूर्वीच राखीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत रितेशपासून वेगळं होत असल्याचं म्हटलं होतं. ‘बिग बॉस 15 मधून बाहेर पडल्यानंतर बरंच काही घडून गेलं आहे. आम्ही आमचं नातं वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला मात्र आम्हाला यात अपयश आलं. अखेर आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला,’ असं राखीनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

टॅग्स :राखी सावंत