Join us

वादविवाद विसरुन मिका सिंगला राखी सावंतने मारली मिठी,म्हणाली Singh Is King

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 7:45 PM

राखी सावंत आणि मिका सिंग एकमेकांना भेटल्याचा आनंद दोघांच्या चेहऱ्यावर दिसत होता. यावेळी राखीने मिकाचे भरभरुन कौतुक केले.

लॉकडाऊनमध्ये अनेकांना दोन वेळच्या जेवणासाठीही तारेवरची कसरत करावी लागत आहेत. अशा कठिण प्रसंगी प्रत्येकजण जमेल तशी प्रत्येकाला मदत करताना दिसत आहे. अनेक सेलिब्रेटींनी मदतीचा हात पुढे करत मैदानात उतरले आहेत. मिका सिंगने देखील फ्रंटलाईन वर्करसाठी लंगर सेवा सुरु केली आहे. इतकेच नाही तर तो स्वतःच्या हाताने गरुजुंना जेवण देत असल्याचे पाहायला मिळाले. 

गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या परिने तो कोरोना काळात मदतीसाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. याआधीही मिकाने दिल्लीमध्ये गरजूंसाठी लंगर ठेवत जेवणाची व्यवस्था केली होती. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे आणि फोटोंमुळे मिकाचे चाहते कौतुक करत आहेत. मध्यंतरी मिका गरजूंना चक्क पैसे वाटताना दिसला होता.

कोरोना काळात मिका ज्या प्रकारे निस्वार्थ लोकांची सेवा करत आहे हे पाहून राखी सावंतनेहीमिका सिंगचे भरभरुन कौतुक केले.  मीडियाचे कॅमेऱ्यांना नेहमीप्रमाणे पोज देत असताना मध्येच मिका सिंगची राखीची भेट झाली.एकमेकांना भेटल्याचा आनंद दोघांच्या चेहऱ्यावर दिसत होता. यावेळी राखीने मिकाचे भरभरुन कौतुक केले. 

कोरोना काळाता मिका दिवस रात्र गरजुंची सेवा करत असल्याचे पाहून त्याचे करावे तितके कमीच आहे. ''ये सिंग बडे ही दिल वाले होते है, हमेशा मदत करते है'' म्हणत मिकाचे राखी कौतुक करताना दिसली. इतकेच काय तर मिका सिंग ज्या प्रकारे कोरोना काळात मदत करत आहे हे पाहून राखी चक्क मिकाच्या पायाही पडली असेच काम करत राहा तुमच्या सारख्या लोकांची देशाला गरज असल्याचेही तिने यावेळी म्हटले. मिकानेही राखीचे कौतुक केले. 'बिग बॉस' कार्यक्रमाला मिळालेले यश हे केवळ राखीमुळे असल्याची आठवण त्याने करुन दिली. दरम्यान मिका सिंगने तो राहत असलेली त्याची बिल्डींग दाखवत घरी येण्यासाठी खास आमंत्रणही दिले.

2006 मध्ये त्याच्याच बर्थ डे पार्टीत राखी सांवत सहभागी झाली होती. त्यावेळी मीकाने राखीला सर्वांसमोर किस केले होते. या घटनेमुळे राखी चांगलीच भडकली होती. मीकाने आपल्याला जबरदस्तीने किस केल्याची तक्रार तिने पोलिसांत दाखल केली होती. 14 वर्षांपूर्वी मीका सिंहचा हा किसचा कारनामा आजही लोक विसरलेले नाहीत.

टॅग्स :राखी सावंतमिका सिंग