बॉलिवूड अभिनेत्री आणि कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी कॅमेऱ्यासमोर ती तिच्या विचित्र कृत्यांमुळे तर कधी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता ती आदिल दुर्रानीसोबतच्या वादामुळे चर्चेत आहे. दोघेही एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. आदिलच्या म्हणण्यानुसार, राखीने त्याला फसवलं आणि अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, आदिलने तिच्याशी गैरवर्तन केलं.
आदिलने तिचा न्यूड व्हिडिओही बनवला. यानंतर आता राखीने मक्का मदिना येथील व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती ढसाढसा रडताना दिसत आहे. राखी सावंतचा व्हिडीओ इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केला आहे. यामध्ये ती मक्का मदिना येथे असल्याचं दिसून येतं. अभिनेत्री उमराहसाठी गेली आहे. व्हिडिओमध्ये ती बुरखा घातलेली दिसत आहे. तसेच ती आदिल दुर्रानीच्या आरोपांमुळे रडताना दिसत आहे.
राखी म्हणते की, 'मी काय करू? . बॉलिवूडमध्ये स्टार बनण्यासाठी तू माझ्याशी खोटं लग्न केलंस. अल्ला माझ्यासोबत न्याय होऊदे. एका महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. त्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. अल्ला मी तुझ्याकडे तक्रार घेऊन आले आहे. माझ्यासोबत न्याय व्हावा, हे काय झालंय माझ्यासोबत." अभिनेत्रीचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर ती ट्रोल्सच्या निशाण्यावर आली आहे.
दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेलं राखी सावंतचं इन्स्टाग्राम अकाउंट काही दिवसांपूर्वी हॅक झालं होतं. "मला एक्सेस नाही. आदिल खान आणि राजश्रीने माझं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक केलं आहे, ते मला जेवू देत नाहीत आणि झोपू देत नाहीत. मी घरी जाते तेव्हा ते माझा छळ करतात" असं अभिनेत्रीने म्हटलं होतं. राजश्रीने राखी सावंतने धमकावल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली, तर आदिल बलात्कार प्रकरणात अटक झाल्यानंतर जामिनावर आता बाहेर आला आहे.
राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी पुन्हा एकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आदिलने राखी सावंतबाबत अनेक मोठे धक्कादायक खुलासे केले आहेत. आदिलने तिला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडलं आणि अनेक वेळा मारहाणही केल्याचं म्हटलं आहे. राखी सावंतनेही दुसरीकडे पत्रकार परिषद घेतली. आदिलच्या प्रत्येक आरोपाला जोरदार उत्तर दिलं आहे.