बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहे. छातीत तीव्र वेदना होत असल्याच्या तक्रारीनंतर मंगळवारी सायंकाळी तिला दाखल करण्यात आले. अभिनेत्रीची तब्येत अचानक बिघडल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. बुधवारी संध्याकाळी राखीचा माजी पती रितेश कुमार याने अभिनेत्रीची प्रकृती गंभीर असून तिची अँजिओग्राफी करण्यात येत असल्याचे सांगितले होते. राखीच्या गर्भाशयात ट्यूमर असल्याचेही त्याने सांगितले होते. दरम्यान आता राखीने स्वतःच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिली आहे. तिने सांगितले की तिच्या गर्भाशयात १० सेंटीमीटरचा ट्युमर आहे आणि डॉक्टर शनिवारी शस्त्रक्रिया करणार आहेत.
राखीने म्हटले की, 'मी लवकरच बरी होईन. माझी तब्येत ठीक नाही. डॉक्टरांना माझ्या गर्भाशयात १० सेंटीमीटरचा ट्यूमर आढळला आहे, ज्याची शस्त्रक्रिया शनिवारी होणार आहे. मला सध्या जास्त बोलता येत नाही. पण रितेश माझ्या तब्येतीबद्दल अपडेट देत राहील. माझी शस्त्रक्रिया झाल्यावर ती गाठही दाखवेन. आता माझे ब्लड प्रेशर आणि इतर गोष्टीही नियंत्रणात आणायच्या आहेत. मी एक अभिनेत्री आहे, डॉक्टर नाही, त्यामुळे मला या सगळ्याबद्दल फारशी माहिती नाही.
''आईचा आशीर्वाद आहे, एक छोटीशी गाठ आहे ती निघून जाईल..''राखीने पुढे म्हटले की, 'इथले डॉक्टर सर्वोत्कृष्ट आहेत आणि ते त्यांचे काम खूप चांगले करत आहेत. मी आयुष्यात कधीही हार मानली नाही. लहानपणापासूनच अनेक अडथळ्यांवर मात करून अनेक अडचणींवर मात केली आहे. मला माहित आहे की मला काहीही होणार नाही, माझ्या आईचे आशीर्वाद माझ्या पाठिशी आहेत. ती माझ्यासोबत आहे. मी एक फायटर आहे आणि मी परत येईन. ही एक छोटीशी गाठ आहे, ती निघून जाईल...'
तब्येतीची अपडेट देताना राखी सावंतला कोसळलं रडू हे सर्व सांगताना राखी भावूक झाली आणि रडू लागली. ती म्हणाली, 'मी परत येणार, नाचणार आणि लोकांचे मनोरंजन करणार.' माझ्या आत एक गाठ आहे याची मला कल्पना नव्हती. मी टॉवेल परिधान करून नाचत होते. घरी परतल्यावर मी बेशुद्ध पडले. रितेश मला दवाखान्यात घेऊन गेला. सर्व रिपोर्ट्स आल्यावर गाठ असल्याचे समोर आले.
रितेश म्हणाला होता - तिला कॅन्सर झाल्याची...रितेशने बुधवारी मीडियाशी बोलताना सांगितले की, तिच्या छातीत आणि पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनेक चाचण्या केल्यानंतर डॉक्टरांना राखीच्या गर्भाशयात गाठ आढळून आली. हा कर्करोग (कॅन्सर) असावा असा संशय आहे. परंतु आणखी काही टेस्ट बाकी आहेत. त्या झाल्यानंतर खरे काय ते समजेल".