एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंत तिच्या अजब-गजब विधानांसाठी लोकप्रिय आहे. ती बर्याचदा पापाराझींशी बोलताना दिसते आणि तिच्या कृत्यांमुळे सर्वांना हसवते. लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी विविध गोष्टी सातत्याने करत असते. नुकतीच राखी सावंत एयरपोर्टवर अनवाणी दिसली. तिने सलमान खानच्यालग्नासाठी आता नवस केला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
राखी व्हिडिओमध्ये ब्लेझरने डोकं झाकताना दिसत आहे. राखीने तिचे डोकं गुलाबी रंगाच्या ब्लेझरने झाकलं आहे आणि ती अनवाणी चालताना दिसत आहे. राखी म्हणते- माझा नवस आहे. सलमान खानचंलग्न व्हावं यासाठी मी श्रीलंका, दुबई येथून चप्पलशिवाय आले आहे. लग्न होत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही.
राखीच्या व्हिडिओवर युजर्स खूप कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिलं की, म्हणजे आता राखी मरेपर्यंत चप्पल घालणार नाही. तर एकाने लिहिलं - राखी वेडी झाली आहे. काहीही करत राहते. त्यासोबतच अनेक जण हसणारे इमोजी पोस्ट करत आहेत.
काही दिवसांपूर्वी राखीने आदिलपासून तलाक घेत असल्याने ब्रेकअप पार्टीचे आयोजन केलं होतं. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राखी लाल रंगाचा लेहेंगा घालून नाचताना दिसली होती. ती आपला आनंद व्यक्त करताना दिसली. ती म्हणाली होती की, मी शेवटी तलाक घेत आहे आणि ही माझी ब्रेकअप पार्टी आहे. लोक दु:खी आहेत पण मी आनंदी आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.