मुंबई : नेहमी वादांमुळे आणि अतरंगी स्वभावामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री राखी सावंतला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हृदयाशी संबंधित आजारामुळे राखी सावंतला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे रिपोर्टद्वारे सांगण्यात येत आहे. रुग्णालयातील राखी सावंतचे काही फोटोही समोर आले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राखी सांवतचे रुग्णालयातील फोटो पाहून चाहत्यांना धक्का बसला असून ती लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी तिचे चाहते प्रार्थना करत आहेत.
Viral bhayani ने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर राखी सावंतचे काही फोटो शेअर केले आहेत. जे रुग्णालयांमधील आहेत. या फोटोंमध्ये राखी रुग्णालयाच्या खाटेवर बेशुद्ध अवस्थेत दिसत आहे. तिच्या एका बोटाला ऑक्सिमीटर आणि दुसऱ्या हाताला विगो जोडलेले आहे, त्यामुळे तिला ग्लुकोज मिळत आहे. एका फोटोत नर्स तिचे बीपी (रक्तदाब) तपासत आहे. अभिनेत्रीचे हे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत.
मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की राखीला हृदयाशी संबंधित समस्या निर्माण झाली, त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. अभिनेत्रीला अशा अवस्थेत पाहून चाहते काळजी व्यक्त करत आहेत. टाईम्स नाऊशी संवाद साधताना तिने याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. ती सध्या बोलण्याच्या स्थितीत नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, तिने स्वतः सांगितलं आहे की, "मला हृदयाशी संबंधित त्रास आहे. हे समजून घ्या...मी आता रुग्णालयामध्ये बोलू शकत नाही, म्हणून मला आता कॉल करू नका."
काहींची तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना तर काहींना वाटतेय नाटक!राखी सावंतचे चाहते तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. एका युजरने असे म्हटले की, ती कशीही असली तरी ती हॉस्पिटलमध्ये असता कामा नये. काही युजर राखी सावंतचे फोटो पाहून ही तिची नौटंकी असल्याचे म्हणत आहेत. एकाने लिहिले, 'विश्वास ठेवणे थोडे कठीण आहे.' अन्य एकाची कमेंट अशी आहे की, 'ती नाटक करतेय असे कोणाला वाटते?' तिच्या मानसिक स्वास्थ्याविषयीही काही युजरनी कमेंट केली आहे. एकंदरित तिचे फोटो पाहून संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्यात.