राखी सावंत (Rakhi Sawant) 'ड्रामा क्वीन' म्हणून प्रसिद्ध आहे. ती नेहमीच तिच्या हटके स्टाईलमुळे ओळखली जाते. बिग बॉस हिंदी, बिग बॉस मराठीमुळे तर ती कायम चर्चेत होती. प्रत्येक सीझनमध्ये राखी एकदा तरी आलेली आहे. तसंच दोन्ही सीझन तिने स्पर्धक बिग बॉसमध्ये ती स्पर्धक म्हणूनही सहभागी झाली आहे. आता नुकतंच राखीने सध्या सुरु असलेल्या बिग बॉस १८ वर प्रतिक्रिया दिली आहे. यंदाचा सीझन कोण जिंकणार हेही तिने सांगितलं आहे.
राखी सावंतने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती म्हणते, "बिग बॉसचा विजेता विवियन डिसेनाच होणार तर करणवीर मेहरा फर्स्ट रनर ठरणार. विवियन आयुष्यात किती कठीण परिस्थितीतून गेला आहे हे तुम्हाला माहिती तरी आहे का? जे लोक विवियनला लक्ष्य करत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की त्याच्या लग्नात अडचणी आल्या होत्या. पण त्याने दिवस रात्र सीरिअलचं शूट केलं. आम्ही घेत असलेली मेहनत तुम्हाला माहितच नाहीए. त्यामुळे उगाच बोलू नका. तुम्ही काहीच करु शकत नाही. काहीही असो, विवियनच जिंकणार. ही राखी सावंतची भविष्यवाणी आहे."
ती पुढे म्हणाली, "विवियनला कोणीही काहीही बोललं तर मी त्यांना उचलून हाणून पाडेन. मी दोन वेळा त्याच्या सीरियलला अवॉर्ड दिला आहे. जर विवियन जिंकला नाही तर मी टेरेसवरुन उडी मारेन. पंख्याला लटकेन. कलर्स वालो, विवियनच जिंकला पाहिजे. हा करण आहे ना हा रनर अप येईल. हाही माझा मित्रच आहे."