बॉलिवूडची ड्रामा क्चिन राखी सावंत हिने नुकतीच लग्नगाठ बांधली. रितेश नावाच्या एका एनआरआय बिझनेसमॅनसोबत राखीने गुपचूप लग्न केले. आधी तिने या लग्नाची बातमी नाकारली. पण यानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम देत, लग्न झाल्याचे तिने मान्य केले आहे. माझा नवरा रितेश एनआरआय आहे, तो लंडनमध्ये राहतो, असे राखीने सांगितले होते. आता राखीने तिच्या नव-याबद्दल आणखी एक खुलासा केला आहे.
होय, माझा पती रितेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कंपनीत काम करतो, असे तिने म्हटले आहे. तिच्या या खुलाशानंतर पुन्हा नव्या चर्चांना उधाण आले आहे. तूर्तास मी लंडनला शिफ्ट होणार नसून, भारतात काम करणार आहे, असेही तिने स्पष्ट केले.
राखी व रितेशची लव्हस्टोरी व्हाट्सअॅपवरून सुरु झाली. चॅटिंग करता करता दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. इतके की, रितेशला न पाहताच राखीने त्याच्यासोबत लग्नाला होकार दिला. गत 28 जुलैला मुंबईच्या जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलात अगदी चार-पाच लोकांच्या उपस्थित राखीने रितेशशी सीक्रेट मॅरेज केले.
राखीने लग्न केल्याची बातमी प्रसारमाध्यमांत उमटली. पण सुरुवातीला तिने याचा इन्कार केला. पण अखेर होय, मी लग्न केले, असे सांगत तिने कबुली दिली. लग्न केल्याचा खुलासा झाल्यास काम मिळणार नाही,अशी भीती मला होती. त्यामुळे मी घाबरले होते. म्हणून लग्नाची बातमी लपवून ठेवली, असे ती म्हणाली होती.
लग्नाच्या दिवशी माझी आई, माझा भाऊ हजर होते. हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने आम्ही विवाह केला. त्याआधी आम्ही नोंदणी पद्धतीने विवाह केला. राकेश याला या लग्नाचा गवगवा नको होता. मीडियात काहीही लीक होऊ नये, ही त्याची इच्छा होती. तो बिझनेस मॅन आहे आणि अतिशय समंजस व्यक्ती आहे, असेही राखीने सांगितले होते.