बॉलिवूडची कॉन्ट्राव्हर्सी क्वीन राखी सावंत सध्या बिग बॉसच्या चौदाव्या सीझनमध्ये पहायला मिळत आहे. राखी याआधी देखील बिग बॉसच्या घरात झळकली होती. त्यावेळी तिच्यामुळे कार्यक्रमाला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. आता राखी पुन्हा एकदा बिग बॉसमध्ये जाऊन हंगामा करत आहे. बिग बॉसमध्ये राखी तिच्या खाजगी आयुष्याविषयी अनेक गोष्टी शेअर करताना दिसत आहे. राखीच्या लग्नाविषयी तिच्या चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. राखी आतापर्यंत दावा करत आली आहे की ती विवाहित आहे. राखीचे लग्न झाल्यावरही कित्येक महिने तिच्या नवऱ्याला कोणीही पाहिले नव्हते आणि राखीदेखील कधी आपल्या नवऱ्यासोबत दिसली नाही. बिग बॉसच्या घरात राखीने या गोष्टीचा उल्लेख केला की ती विवाहित आहे आणि तिचा नवरा परदेशात राहतो.
राखी सावंतच्या पतीला आजपर्यंत कोणीही पाहिले नव्हते. पण राखी बिग बॉसच्या घरात गेल्यापासून तिचा पती विविध वाहिन्यांना मुलाखती देताना दिसत आहे. आता तर एका मुलाखतीत रितेशने बिग बॉसच्या घरात जाण्याची इच्छा वर्तवली आहे. रितशने एका मुलाखतीत सांगितले आहे की, मला बिग बॉसच्या ख्रिसमस स्पेशल एपिसोडमध्ये हजेरी लावण्याबाबत विचारण्यात आले होते. पण त्यावेळी मी प्रचंड बिझी होतो. पण मी कधी घरात जाऊ शकतो याविषयी मी कार्यक्रमाच्या टीमला सांगितले आहे. याबाबत मला जानेवरीच्या पहिल्या आठवड्यात वाहिनीद्वारे सांगण्यात येईल. घरात जाऊन मला राखीला सपोर्ट करायचा आहे. राखी ही खूपच चांगली व्यक्ती आहे. ती माझ्या आयुष्यात आल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो.
राखी सावंतचा नवरा रितेश युकेमध्ये वास्तव्यास असून एक बिझनेसमन आहे. राखी सावंतचा पती रितेशने बॉम्बे टाइम्सशी बातचीत केली होती. त्याने सांगितले होते की, 'माझ्या स्वार्थी हेतूमुळे मी अद्याप सर्वांसमोर आलो नाही. माझे लग्न आतापर्यंत लपवून ठेवले होते, ही माझी चूक होती. मला असे वाटायचे की मी राखीशी माझी ओळख असणे आणि मी राखीशी लग्न करणे हे जर जगाला समजले तर माझ्याबद्दल अनेक अफवा पसरवल्या जातील.