Join us

Rakhi Sawant : आईच्या मृत्यूदिवशीच राखीला पतीने केली मारहाण, राखीच्या भावाचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 17:31 IST

राखी सावंतचा भाऊ राकेश सावंतने माध्यमांसमोर येत अनेक खुलासे केले आहेत.

Rakhi Sawant :  ड्रामा क्वीन राखी सावंतच्या आयुष्यातील वादळ काही थांबण्याचे नाव घेत नाहीए. राखीने पती आदिल विरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली. राखीच्या तक्रारीवरुन आदिल दुर्रानीला पोलिसांनी ताब्यात घेतले. आता नवीन आलेल्या माहितीनुसार राखीच्या आईचे निधन झाले त्याच दिवशी आदिलने राखीला मारहाण केल्याचा खुलासा राखीच्या भावाने केला आहे. 

राखी सावंतचा भाऊ राकेश सावंतने माध्यमांसमोर येत अनेक खुलासे केले आहेत. राकेश म्हणाला, 'मी तर तेव्हाच बोललो होतो जेव्हा आदिलने राखीवर हात उचलला होता. माझा मामा सुद्धा बोलला होता. तेव्हा आदिलने आमच्यासोबत खूपच वाईट पद्धतीने वर्तवणूक केली होती. हे घरातले प्रकरण आहे असं तो म्हणाला होता. घरातलं प्रकरण म्हणजे याचा अर्थ हा होत नाही की तू आमच्या मुलीवर हात उचलशील.प्राण्यासारखी वर्तवणूक तिच्यासोबत केली. दुबईत देखील तिचे पैसे उडवले. जेव्हा माझ्या आईचे निधन झाले त्याच दिवशी त्याने राखीला खूप मारले. राखीच्या शरीरावर काळे डागही होते तिला कुपरमध्ये पाठवले.'

आदिलवर आयपीसी कलम 504, 506, 406, आणि 323 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आदिलने पैसे आणि दागिने घेतल्याचाही आरोप राखीने केला आहे. तसेच आदिलचे विवाहबाह्य संबंध असल्याचा खुलासा राखीने केला आहे. 

टॅग्स :राखी सावंतसोशल मीडियाट्रोलपोलीस ठाणे