अश्विनी कासार, अभिनेत्री (कट्टी बट्टी - झी युवा)
तसे तर मला खूप भाऊ आहेत, पण मानस हा माझा सख्खा भाऊ आहे. सध्या पुण्याला बीडीएस करतोय. अभ्यासात हुशार तर आहेच पण उत्तम तबला वाजवतो, उत्तम चित्रकार आहे, फोटोग्राफी पण कमाल करतो आणि खूपछान लिहितो. माझ्यापेक्षा लहान असूनसुद्धा तो खूप समजूतदार आहे. तो आणि आम्ही एकमेकांपासून लांब असलो तरी आमचा बॉण्डिंग खूप भारी आहे. आम्हाला प्रत्येक गोष्ट एकमेकांसोबत शेअर करायची असते. तोटेक्नोसॅव्ही असल्यामुळे गाडजेट्स खरेदी करण्यात सतत मदत करतो कधी कधी माझ्यापेक्षा मोठा होऊन मला समजावतो तर कधी माझा ओरडाही खातो. माझा लाडका भाऊ आहेत तो.
हृता दुर्गुळे, अभिनेत्री (फुलपाखरू - झी युवा)
मला एक लहान भाऊ आहे आणि तो लहान जरी असला तरी तो माझ्यापेक्षा समंजस आणि समजूतदार आहे. तो त्याच्या कामाशी एकनिष्ठ असतो आणि त्याची हि गोष्ट मला अतिशय आवडते. माझ्यापेक्षा लहान असूनदेखील तोमाझी मोठ्याभावाप्रमाणे काळजी घेतो. तो प्रेमळ आणि निस्वार्थ आहे. तो आमच्या कुटुंबातील दुआ आहे जो सगळ्यांना एकमेकांशी जोडून ठेवतो. रक्षाबंधननिमित्त मी देवाकडे त्याच्या प्रगतीसाठी प्रार्थना करते.
सुयश टिळक, अभिनेता (बापमाणूस - झी युवा)
मला एक लहान बहीण आहे. तिचं नाव रिया आहे. मला तिचा खूप अभिमान आहे. ती आमच्याच कुटुंबात नाही तर आमच्या सर्व नातेवाईकांची लाडकी आहे आणि ती त्यांच्यासोबत खूप जास्त चांगल्याप्रकारे संपर्कात आहे. तीस्वावलंबी आहे, तिच्या कामांसाठी ती कोणावर अवलंबून नसते. ती शिक्षणानिमित्त परदेशात असल्यामुळे आमची रक्षाबंधनला भेट होऊ शकत नाही पण आम्ही अनेक इंटरनेटमुळे जग जवळ आलं आहे त्यामुळे आम्ही खूपचांगले संपर्कात आहोत. यावर्षी तिचं लग्न होणार असून तिच्यासाठी मी खूप खुश आहे.
प्रियांका बर्वे, सूत्रसंचालक (संगीत सम्राट पर्व २ - झी युवा)
मला कोणी भाऊ नाही आहे आणि माझी सर्व चुलत भावंडं ही परदेशात असतात त्यामुळे मला रक्षाबंधन या सणाच्या दिवशी खूप एकटं वाटतं. जेव्हा ही गोष्ट मी राहुल देशपांडे यांची पत्नी नेहा हिला सांगितली तेव्हा तिने मलाराहुल यांना राखी बांधायचं सुचवलं. तेव्हापासून मी गायक राहुल देशपांडे यांना प्रत्येक वर्षी न विसरता राखी बांधते. त्यांनी मला माझ्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीत खूप पाठिंबा दिला. माझा आत्मविश्वास राहुल यांनी नेहमीचद्विगुणित केला. राहुल देशपांडे यांना मी माझ्या सख्खा भावापेक्षा जास्त मानते कारण माझा सख्खा भाऊ जरी असता तरी तो माझ्यासाठी इतकं करू शकला नसता.