Join us

Rakul Preet Singh : "शाळांमध्ये लैंगिक शिक्षण आवश्यक", रकुल प्रीत सिंगने सांगितला आपला किस्सा 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 2:54 PM

Rakul Preet Singh on Sex Education : कुठेतरी आपल्याला लैंगिक शिक्षणाचे महत्त्व समजते, परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते, असे रकुल प्रीत सिंगने सांगितले.

मुंबई : 'डॉक्टर जी' चित्रपटानंतर बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग लवकरच 'छत्रीवाली' चित्रपटात दिसणार आहे. दोन्ही चित्रपट महिलांच्या रिप्रोडक्टिव हेल्थवर आधारित आहेत. एका पोर्टलशी संवाद साधताना रकुल प्रीत सिंगने शाळांमध्ये लैंगिक शिक्षणाचे महत्त्व सांगितले. कुठेतरी आपल्याला लैंगिक शिक्षणाचे महत्त्व समजते, परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते, असे रकुल प्रीत सिंगने सांगितले.

लैंगिक शिक्षण आवश्यक आहे आणि म्हणूनच तो पुस्तकांचा आणि अभ्यासक्रमाचा भाग आहे, असे 'छत्रीवाली' चित्रपटाचा ट्रेलर हेच सांगतो की, असे अभिनेत्रीने सांगितले. रकुल प्रीत सिंग म्हणाली. "मी जसजशी मोठी होत गेली, तसतशी मी विचार करत राहिली की लैंगिक शिक्षण ही काळाची गरज आहे आणि ते महत्त्वाचेही आहे. लैंगिक शिक्षण तुम्हाला नैसर्गिक मानवी प्रगती समजून घेण्यास मदत करते. आपण त्यापासून लांब जाऊ शकत नाही."

याबद्दल प्रत्येकाला माहिती असणे खूप गरजेचे असल्याचे रकुल प्रीत सिंगने सांगितले. यासोबतच हे जाणून घेण्यासाठी योग्य वय काय आहे, हेही सांगितले. रकुल प्रीत सिंग म्हणाली, "मुल 13-14 वर्षांच्या वयात यौवनात प्रवेश करते आणि हीच वेळ असते जेव्हा त्यांना त्यांच्या लैंगिक आरोग्याशी संबंधित सर्व गोष्टी जाणून घेणे आवश्यक असते."

याचबरोबर, रकुल प्रीत सिंगने असेही सांगितले की, जेव्हा हे शाळेत शिकवले जाते, तेव्हा बहुतेक लोक या विषयावर बोलण्यास टाळतात. तसेच, आपल्या बालपणीची कहाणी सांगताना रकुल प्रीत सिंग म्हणाली, "मला वाटतं त्यावेळी मी नववीच्या वर्गात असेन. त्यावर आम्ही हसायचो. आम्हाला लाज वाटत होती. आम्ही आमच्या शिक्षकांना याबद्दल काही विचारायचे नव्हते. वर्ग कधी संपेल असा प्रश्न पडायचा."

दरम्यान, रकुल प्रीत सिंगच्या 'छत्रीवाली' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. रकुल प्रीत सिंगने या चित्रपटाला ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे म्हटले आहे. तसेच, या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली असून त्याचे फळ मिळणार असल्याचा विश्वास रकुल प्रीत सिंगने व्यक्त केला. हा चित्रपट एक फॅमिली ड्रामा आहे. चित्रपटाची कहाणी हरयाणाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. यामध्ये रकुल प्रीत सिंग लोकांना लैंगिक शिक्षण आणि त्याचे महत्त्व समजून सांगते.

टॅग्स :रकुल प्रीत सिंगबॉलिवूड